खैराच्या लाकडाची तस्करी सागोला वनविभागाच्या जाळ्यात,अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोघांना पकडले.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, May 27, 2024

खैराच्या लाकडाची तस्करी सागोला वनविभागाच्या जाळ्यात,अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोघांना पकडले....

बागलवाडी वनक्षेत्रात वनविभागाची कारवाई, लाकूड मालासह वाहन जप्त...
सागोला/प्रतिनिधी
सागोला बागलवाडी येथील राखीव वनक्षेत्र गट नंबर-२७२ मध्ये खैर झाडांची अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसून आले. त्यादरम्यान वृक्षतोड करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले असता दोघेजण वनक्षेत्रात जागेवरच लाकूड माल व लाकूड कटर मशीन ठेवून पळून जाताना दोघांना पाठलाग करून पकडले. दरम्यान, याप्रकरणी आरोपींना सांगोला न्यायालयात हजर केले असता दत्तात्रय शिवाजी गोडसे (रा. नरळेवाडी), मारुती विलास गळवे (रा.वाकी शिवणे, ढेंबरेवस्ती) यांना ३० मे पर्यंत वन कोठडी दिल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी की, वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सर्व वनाधिकारी कर्मचारी २५ मे रोजी रात्रीची गस्त घालत असताना बागलवाडी वनक्षेत्रात खैर लाकूड मालासह कटर जागेवरच टाकून दोघेजण पळून जाताना वनविभागाच्या सुरक्षा पथकाने पाठलाग करून दोघांना महूद येथे पकडले. आरोपींच्या ताब्यातील एम. एच.४५- एबी-०४४३ या दुचाकीसह एम. एच.४६-एएफ ९५३९ या पिकअपमधील १५ नग खैर लाकूड माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहायक वनसंरक्षक बी.जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी तुकाराम जाधवर, वनपाल एस. एल. मुंढे, एस. एल. वाघमोडे, जी. बी. व्हरकाटे, वनरक्षक कृष्णा मुढे, आर. व्ही. कवठाळे, ए. के. करांडे, व्ही. पी. इंगोले, कंत्राटी वाहन चालक संकेत बाबर वनमजूर यांनी केली आहे.

Pages