ब्रेकिंग न्यूज :- पाटकळ गावात गावभेट दौऱ्यावर आलेल्या आ. प्रणिती शिंदे यांना मराठा आरक्षण 24 गाव पाणी प्रश्नावरून युवकांनी हाकलून लावले.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, March 6, 2024

ब्रेकिंग न्यूज :- पाटकळ गावात गावभेट दौऱ्यावर आलेल्या आ. प्रणिती शिंदे यांना मराठा आरक्षण 24 गाव पाणी प्रश्नावरून युवकांनी हाकलून लावले....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील आ.प्रणिती शिंदे यांचा गाव भेट दोरा दरम्यान पाटखळ येथील मराठा आरक्षण 24 गाव पाणी प्रश्नावरून युवकांनी हाकलून लावले येत्या काही दिवसात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील गाव भेट दौऱ्यावर आलेल्या लोकसभेच्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आ.प्रणिती शिंदे यांना पाठकळ येथील सुमारे दोनशे युवकांनी मराठा आरक्षण प्रलंबित असताना व 24 गावच्या पाण्याचा प्रश्न पेटत असताना तुम्ही गाव भेट दौरा घेऊ नका असे सांगत त्यांच्या दौऱ्याला विरोध करीत त्यांना कार्यक्रम न घेता हाकलून लावले.
सोलापूर मध्य च्या आ. प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून त्यांचे तिकीट कन्फर्म झाल्याचे समजते. त्या अनुषंगाने त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील काही गावांचा आज दि.6 रोजी गाव भेट दौरा सुरू केला असून पहिल्यांदा पाटकळ येथे गाव भेट दौऱ्याला सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली होती.यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी दौऱ्याची पूर्व तयारी केली होती. आ. प्रणिती शिंदे या गावात आल्यानंतर गावातील सूमारे दोनशे युवकांनी मंगळवेढा तालुक्यातील 24 गाव शेतीच्या पाण्याचा प्रश्न अद्याप पर्यंत सुटला नाही. या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असून या भागातील नागरिक या पाण्यासाठी आंदोलन करीत असताना आपण या भागात गावभेट दौरा करू नये तसेच मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, सगळ्यांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत काहींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु याचा काही उपयोग झाला नाही त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडलेल्या खुर्च्या व इतर साहित्य गोळा केले.त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुसरीकडे एका सभामंडपात कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले होते परंतु तिथेही जाऊन त्या संबंधित नागरिकांनी कार्यक्रम करू नका असे सांगितले.त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढील गावात जाणे पसंत केले.

Pages