अखेर पाटखळ येथील त्या मोरे पिता पुत्राच्या खडी क्रेशर ला महसुल विभागाकडून तिसऱ्यांदा ठोकले सील...... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, February 8, 2024

अखेर पाटखळ येथील त्या मोरे पिता पुत्राच्या खडी क्रेशर ला महसुल विभागाकडून तिसऱ्यांदा ठोकले सील......

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशरला महसूल विभागाने तिसऱ्यांदा सिल ठोकून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, पाटखळ-नंदेश्वर रस्त्यालगत गट.नं 392 समाईक क्षेत्रामध्ये शासकीय परवानगी न घेता दामाजी स्टोन क्रेशर कार्यरत होता. सदर स्टोन क्रेशरमुळे होणार्या आवाजामुळे तसेच त्यामधून निघणाऱ्या धुळीमुळे पाटखळ येथील ग्रामस्थ शेतकरी तसेच वाड्या वस्त्यावरील ग्रामस्त यांच्या आरोग्यावर व पिकावर विपरीत परिणाम होत आहे या स्टोन क्रेशरमुळे परिसरातील ग्रामस्त, शेतकरी, विद्यार्थी यांना डोळ्याचे व कानाचे आजार जडू लागले असल्याची तक्रार पाटखळ येथील ग्रामस्थांनी मंगळवेढ्याचे तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सदर खडी क्रेशर ला भेट देऊन पाहणी केली तसेच यावेळी काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्याने प्रांताधिकार्यांनी तलाठी व मंडलअधिकार्याच्या मदतीने पंचनामे करून सदर खडी क्रेशरला सील ठोकले होते. येथील खडी क्रेशर मालकाने हा व्यवसाय सुरु करताना येथील जमिनीचा गट हा सामाईक असताना होता ही बेकायदेशीररित्या खरेदी करून आपला व्यवसाय थाटला होता. या जमिनी बाबत देखील या खडी क्रेशर मालकाने शेतकऱ्याला गोलमाल केले होते. प्रांताधिकार्यांनी सदर खडी क्रेशर मालकास मुळ कागदपत्रे माहितीस्तव मागितली होती परंतू ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर खडी क्रेशर थाटला आहे या बाबतची माहिती मंगळवेढा तहसीलमधील गौण खनिज विभागाकडे माहिती अधिकारातून माहिती मागितली असताना संबंधित शेतकऱ्यास आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने खडी क्रेशर च्या परवानगीतील गोलमालपणा सिध्द झाला होता. त्यामुळे बऱ्याच तक्रारीनंतर त्यास महसूल प्रशासनाने दोनदा सिल ठोकले होते.परंतु खडी क्रेशर मालकाने महसूल मधील काहींना मलिदा देवून मॅनेज करून त्या खडी क्रेशर चे इतत्रर स्थलांतरित करण्याचे कारण सांगून सील काढले होते.
त्यामुळे येथील शेतकरी पोपट इंगोले यांनी पुन्हा एकदा मौजे पाटकळ येथील बेकायदेशीर खडी क्रेशर वर कारवाई बाबत महसूल विभागाकडे तक्रार केली होती त्यानंतर पोपट इंगोले यांनी अभिजीत भीमराव मोरे व भीमराव बाबुराव मोरे यांचे पाटखळ येथील खडी क्रेशर बाबतच्या तक्रारी अर्जानुसार निवासी नायब तहसीलदार मंगळवेढा यांनी चौकशी करून दि. 21 मार्च 2022 रोजी वादातील जमीन संदर्भात 1966 मधील कलमांव्ये अनाधिकृत आकृषक वापर केल्याबाबत खडी क्रेशर सुरू झाले पासून दंडात्मक कारवाई करण्यात यावी असा स्वयम् स्पष्ट अहवाल सादर केला आहे. तसेच ज्या अर्थी सहाय्यक संचालक नगर रचना सोलापूर यांनी त्यांच्याकडील दिनांक 1 फेब्रु 2018 अन्वये सदरची जागा पाटखळ-नंदेश्वर-भोसे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 65 या वर्गीकृत रस्त्यालगत विषयांकित जागा असल्याने औद्योगिक खडी क्रेशर प्रयोजनासाठी बिगर शेती मंजुरीबाबत शिफारस नाकारले आहे त्याअर्थी तहसीलदार मंगळवेढा यांनी प्रधान केलेले अधिकाराचा वापर करून मौजे पाटकळ येथील गट नंबर 392 मधील अभिजीत भिमराव मोरे यांच्या मालकीचा खडी क्रेशर सील करण्याचा आदेश दिला आहे त्यानुसार दि.25 मार्च 2021 रोजी महसूल विभागाने हा क्रेशर सील केला होता.
परंतु पुन्हा एकदा संबधित खडी क्रेशर मालकाने येथील महसूल विभागाच्या मदतीने 11 महिन्यापूर्वी इतत्रर स्थलांतरित करण्याचे कारण पुढे करून सिल काढून घेतले होते परंतु शेतकरी पोपट इंगोले यांच्या सतर्कतेमुळे व महसुलच्या काही अधिकाऱ्यांचे पितल उघडे पडल्याने तहसीलदार यांच्या आदेशाने मंडलाधिकारी मौलानी यांनी दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा सिल ठोकले असून न्यायप्रविष्ट बाब असल्याने सिल काढता येणार नाही असा आदेश दिला आहे.सिल ठोकले असेल तरी एवढी वर्षे बेकायदेशीर चालवनाऱ्या खडी क्रशर मालकाला दंड करणे अपेक्षित असताना महसूल विभागाने केवळ सील करून कारवाई केल्याचे दाखवून देत आपली पाठ थोपटून घेतली आहे.

Pages