पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीच्या जागेवर महाराष्ट्र शासनाच्या"वैशिष्ट्यपूर्ण योजना"अंतर्गत वीस लाख रुपयाचा निधी मंजूर:-आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, February 29, 2024

पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीच्या जागेवर महाराष्ट्र शासनाच्या"वैशिष्ट्यपूर्ण योजना"अंतर्गत वीस लाख रुपयाचा निधी मंजूर:-आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश....

पंढरपूर/प्रतिनिधी पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीच्या जागेवर महाराष्ट्र शासनाच्या "वैशिष्ट्यपूर्ण योजना" अंतर्गत विशेष अनुदान स्वरूपात वीस लाख रुपयाचा निधी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे कणखर आमदार समाधान दादा आवताडे यांनी पंढरपूर नगरपरिषदेस मिळवून दिला. यासाठी आमदार आवताडे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्याबद्दल सम्यक क्रांती मंच चे संस्थापक सिध्दार्थ जाधव, प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, प्रदेश सचिव स्वप्नील गायकवाड, जिल्हाध्यक्ष अक्षय सोनवणे यांनी समाधान व्यक्त करताना त्यांचे मनःपूर्वक आभार मानत हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी बोलताना सम्यक क्रांती मंच चे प्रदेश सचिव स्वप्नील गायकवाड यांनी पंढरपूर व मंगळवेढा येथील नगरपरिषदांच्या विविध विकासकामांसाठी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून ९ कोटी ४१ लाखाचा निधी मंजूर झाला असून सदर मंजूर निधीमध्ये पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत विकास कामांसाठी ४ कोटी ४१ लाख व मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत ५ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती दिली.या नियोजित निधी मंजुरीसाठी आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार व पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या निधीची मागणी केली होती. मंजूर विकास कामांच्या तात्काळ कामांचे एस्टीमेट तसेच टेंडर प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आदेश मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी व इतर प्रशासकीय यंत्रणांना दिली असल्याची माहिती स्वप्नील गायकवाड यांनी दिली.

Pages