सचिवाच्या खोट्या सह्या करून विद्या विकास मंडळ संस्थेचा बोगस चेंज रिपोर्ट बनवला...
..
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील विद्या विकास मंडळ या संस्थेचे अध्यक्ष श्रीमती.शुभदा सुभाष शहा यांना अध्यक्ष करणेसाठी 29ऑगस्ट 2021 रोजी श्री संत दामाजी महाविदयालय मंगळवेढा येथे संस्थेची कोणतीही सभा झालेली नसताना सभा झाल्याचे बोगस दाखवुन त्यावर आमच्या बनावट सहया केल्या.तसेच धर्मादाय उपायुक्त यांचेकडे पाठविलेले संमती पत्र व नाहरकत पत्र यावरही परस्पर आमच्या नावाच्या बनावट सहया करून खोट्या सहया केलेली कागदपत्रे खरी आहेत असे भासवुन धर्मादाय उपायुक्त यांचेकडे सादर करून चेंज रिपोर्ट मंजुर करुन घेतल्याप्रकरनी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती शुभदा सुभाष शहा,राहुल सुभाष शहा,उपाध्यक्ष बाबासाहेब उर्फ भिमराव विठठल पाटील ,सचिव किसन जगन्नाथ गवळी यांचेविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे सभासद एँड.रमेश दीनानाथ जोशी यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत एँड. रमेश जोशी यांनी म्हटले आहे की सन 1978 साली स्व. रतनचंद शिवलाल शहा यांचे नेतृत्वाखाली श्री विदया विकास मंडळ या नावाची रजीस्टर संस्था मंगळवेढा येथे सुरु केली होती. सदर संस्थेमार्फत श्री.संत दामाजी महाविद्यालय व श्री.संत दामाजी हायस्कूल चालविले जाते. सदर संस्थेचा मी 1978 सालचा संस्थापक सभासद असून सध्या श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा येथे सचिव पदावर कार्यरत आहे. सदर संस्थेमध्ये 8 जनांचे कार्यकारी मंडळ असून एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, दोन सचिव, एक खजीनदार व तीन संचालक अशी पदे आहेत. कार्यकारी मंडळाचा कार्यकाल घटनेप्रमाणे तीन वर्षांचा आहे. आमचे मंडळाचा कार्यकाल संपलेवर नवीन मंडळ निवडताना सर्व संस्थापक सदस्यांची जनरल मिटींग घेउन नवीन कार्यकारीणी निवडली जाते. रितसर सर्व सभासदांना रजिस्टार पोस्टाने सभेची नोटीस द्यावी लागते. अशी नियमावली आहे.
उपस्थित सभासदामधून एखाद्या जेष्ठ सभासदाला अध्यक्ष करून प्रक्रीया पार पाडली जाते. श्री.संत दामाजी महाविद्यालयामध्ये शिक्षक नोकर भरती प्रक्रीयेसाठी 20 व 21 जून 2023 रोजी मुलाखती होत्या त्या सभेमध्ये संस्था प्रतिनीधी म्हणुन कोणी बसायचे यावर थोडासा बाद झाला. त्यावेळी मी संस्था प्रतिनीधी उपस्थित राहण्यास दुसरे सचिव किसन जगन्नाथ गवळी व उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी हरकत घेतली. त्यावेळी किसन गवळी यांनी संस्था प्रतिनीधी म्हणुन बाबासाहेब पाटील बसतील म्हणुन लेटर पॅडवर पत्र शासन प्रतिनीधी शिक्षण सहसंचालक काकडे साहेब यांना दिले त्यावेळी मी म्हटले आपण दोघेही सचिव आहोत आपण उपाध्यक्ष पद श्रेष्ठ असताना त्याना आदेश कसे देउ शकतो. असा मुददा निघालेवर उपाध्यक्ष याना अध्यक्ष यांनी पत्र व अधिकार द्यावे लागतील असे म्हटलेवर त्यांनी ओरडून अध्यक्षांचे पत्र आणायला शिपाई किंवा कारकुन पाठविला व मी म्हणालो आपले अध्यक्ष अजित शहा हे पुण्यात असतात तर पत्र आणायला कुठे पाठविले आहे अशी विचारणा केली तर अर्धा तासात एकजणाकडून पत्र आणून किसन गवळी यांनी शिक्षण सहसंचालक काकडे सो यांना हातात दिले असता मी पाहण्यास मागितले तर त्याच्यावर एस. एस. शहा अशी सही होती. मी म्हणालो ही अध्यक्षाची सही नाही, असे म्हटल्यावर सदर किसन गवळी यांनी खिशातुन एक कागद काढून त्या अधिका-याकडे दिला. तर तो कागद पाहिला असता चॅरिटी कमिशनर (धर्मादाय उपायुक्त) कडील चेंज रिपोर्ट होता. त्यावेळी मला समजले श्री.विदया विकास मंडळ या संस्थेचा अध्यक्ष या श्रीमती शुभदा सुभाष शहा आहेत. परंतु मी संस्थेचा सचिव असुनही मला याबाबत कोणत्याही प्रकाराची माहीती नाही तसेच मी असे समजत होतो की सदर संस्थेचे अध्यक्ष अजित शहा हे आहेत. चेंज रिपोर्टवरती दि.17/08/2021 रोजी संस्थेची सर्वसाधारण सभेची नोटीस दाखवली आहे व दि.29/08/2021 रोजी सभा झाल्याचे दाखविले आहे. त्या सभेत सदरच्या निवडी झाल्याचे नमूद केले आहे. त्यावेळीही आम्ही हजर नव्हतो, ती सभाच झालेली नाही. त्या सभेची नोटीस वगैरे काहीही मला मिळालेली नाही, मागील पाच ते सहा वर्षापासुन एकही जनरल मिटींग झालेली नाही. त्यानंतर मी मा धर्मादाय उपायुक्त यांना पत्र देवुन सर्व कागदपत्रांची मागणी केली असता मला असे दिसुन आले की धर्मादाय उपायुक्त यांना जो चेंज रिपोर्ट सादर केला ज्यामध्ये 12/09/2022 रोजी नाहरकत प्रमाणपत्र व संमती पत्र असे दिले असुन त्या पत्रावर माझ्या नावाच्या पुढे माझी सही केल्याचे दिसून आले. परंतु कुठेही त्या चेंज रिपोर्टवरती मी सहया केलेल्या नाही. ती सही मी पाहीली असता ती सही मी केली नसुन माझी सही कोणीतरी खोटी व बनावट सही केली आहे. त्यानंतर मी माहीती घेतली असता आमच्या संस्थेचा अध्यक्ष हा प्रत्यक्ष 2018 मध्येच चेंज केला असुन त्यावेळीसुध्दा कोणतीही सभा झालेली नव्हती. तसेच खजिनदार बाळकिसन गोपीलाल मर्दा हे तथाकथित दाखविलेल्या दि.29/08/2021 चे मिटींगनंतर एक महिन्याचे आत मयत झाले आहेत. त्यापुर्वी ते सहा महिन्यापासुन अंथरुणावर झोपुन होते. तसेच माझ्याबरोबर मागील व विद्यमान कार्यकारीणीमध्ये डॉ. अशोक दामोदर सुरवसे रा. सोलापूर हे देखील आहेत. त्यांची देखील खोटी सही केल्याबददल माझ्यासारखीच तक्रार आहे.

खोटया सहया केल्याचे समजल्यावर मी व डॉ. अशोक सुरवसे आम्ही मिळून सोलापूरला जाउन मा. धर्मदाय उपायुक्त याच्याकडे दि. 24/07/2023 रोजी लेखी तक्रारी अर्ज दिला आहे. सदर सहया धर्मादाय उपायुक्त यांचा चेंज रिपोर्ट नं. 1919/2022 वरील निशानी 2 व 3 वरील तपासून घेण्यासाठी पुणे येथील सोल्युशन या संस्थेचे हॅन्ड रायटिंग एनालिस्ट श्री.राजेंद्र भिडे यांच्याकडुन अधिकृत तपासणी करून अहवाल आणला आहे. त्यामुळे आमच्या सहया खोटया केल्याची त्या रिपोर्टवरून खात्री झाली आहे. तोही रिपोर्ट यासोबत जोडला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीमती शुभदा सुभाष शहा यांना अध्यक्ष करणेसाठी त्याचा मुलगा नामे राहुल सुभाष शहा व सचिव किसन जगन्नाथ गवळी उपाध्यक्ष बाबासाहेब उर्फ भिमराव पाटील या सर्वांनी मिळुन दि 29/08/2021 रोजी श्री.संत दामाजी महाविदयालय मंगळवेढा येथे कोणतीही सभा झाली नसताना सभा झाली आहे असे दाखवुन त्यावर आमच्या बनावट सहया केल्या आहेत तसेच धर्मादाय उपायुक्त यांचेकडे पाठविलेले संमती पत्र व नाहरकत पत्र यावर आमच्या परस्पर आमच्या नावाच्या पुढे बनावट सहया केल्या आहेत.
आमच्या खोट्या सहया केलेली कागदपत्रे खरी आहेत असे भासवुन मा धर्मादाय उपायुक्त यांचेकडे सादर करून फसवणुक करुन चेंज रिपोर्ट मंजुर करुन घेतला आहे. म्हणुन माझी संस्थेचे अध्यक्ष 1.श्रीमती शुभदा सुभाष शहा, 2.राहुल सुभाष शहा दाघही रा.चोखामेळा चैक, बाजारपेठ, मंगळवेढा 3.उपाध्यक्ष बाबासाहेब उर्फ भिमराव विठ्ठल पाटील रा.बोराळ मंगळवेढा 4.सचिव किसन जगन्नाथ गवळी रा.सरकारी गोडावून पाठीमागे, मंगळवेढा यांच्याविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.