मंगळवेढ्यात महसूल विभागातील लाचखोरी थांबेना; पाच हजाराची लाच स्विकारताना नायब तहसीलदारासह महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, June 29, 2024

मंगळवेढ्यात महसूल विभागातील लाचखोरी थांबेना; पाच हजाराची लाच स्विकारताना नायब तहसीलदारासह महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात....

मंगळवेढा/प्रतिनिधी
वाळू व्यवसायात सांगोला तहसील कार्यालयाने केलेल्या कारवाईतील जप्त वाहन सोडण्यासाठी प्रांत कार्यालयातून परवानगी देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये लाच स्वीकारताना मंगळवेढा प्रांत कार्यातील नायब तहसीलदार प्रकाश विठ्ठल सगर व महसूल सहाय्यक विवेक ढेरे याला लाच लुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले, दरम्यान तीन आठवड्यात दाेन वेळा महसुल कर्मचार्यानी लाच स्विकारल्याने मंगळवेढ्यात लाच स्विकारन्यात आव्वल ठरले आहे. या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, सांगोला तहसील कार्यालयाने अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करत टाटा मेगा वाहन सन 2020 साली पकडले हाेते.त्या जप्त वाहनावर 1 लाख 37 हजार 684 इतका दंड आकारण्यात आला.सदर दंडाची रक्कम भरल्याने वाहन सोडण्याकरता प्रांत कार्यालयाची परवानगी आवश्यक होती सदरची परवानगी देण्यासाठी तक्रारदाराने प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी वाहन सोडण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपये निश्चित करून पाच हजाराची लाच स्वीकारण्यात आली. सदरची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार प्रकाश विश्वनाथ सगर( वय 55 रा.उमरगा,/ समृद्धी नगर सोलापूर )व महसूल सहाय्यक विवेक ढेरे (वय 32 रा. इचलकरंजी ता. हातकलंगले जि. कोल्हापूर) यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले ही कारवाई साेलापुर लाचलुचपतच्या विभागाने केली आहे.
महसूल कार्यालयाकडून त्यांच्या कामासाठी आलेल्या जनतेला छळण्याचे प्रकार सुरूच असून गतवर्षी याच कार्यालयात महामार्गासाठी बाधित जमीनीचा मोबदला देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठ्यावर कारवाई करून बडे मासे मोकळे सोडण्यात आले. तर गत आठवड्यात तहसील कार्यातील मंडल अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक करण्यात आली ही घटना ताजी असतानाच आज प्रांत कार्यालयात थेट नायब तहसीलदार व महसूल सहायक लाच प्रकरणात लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात सापडले या दोघांवर कारवाई करताना या कारवाईच्या अनुषंगाने थेट मुळाशी जाऊन यामध्ये बडे अधिकारी आहेत का याचा शोध घ्यावा अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे कारण सध्या महसूल विभागाकडून तालुक्यातील जनतेला छळण्याची परिशिमा गाठली यामध्ये अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या सहभाग आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने काना डाेळा केल्यामुळे जनतेने अखेर लाचलुचपत विभागाचा पर्याय निवडला आहे.यामधे वरिष्ठ आधिकार्याची जबाबदारी येत आसल्याने त्याचींही चाैकशी हाेणे गरजेचे आहे.राष्ट्रीय महामार्गात तर आमचा हक्कच समजून टक्केवारी घेतल्या शिवाय बाधीत शेतकर्याना पैसेच दिले जात नसल्याचे तक्रारी आहेत.साेलापुर येथिल राष्ट्रीय महामार्ग कार्यालयानेच सवय लावल्याने लाललुचत विभागाने येथेही आपली करडी नजर ठेवुऩ संबधीतांना जेरबंद करून शेतकर्यांना त्यांच्या छळातुन मुक्त करावे आशि मागणी हाेत आहे.

Pages