मंगळवेढयाचे गटविकास अधिकारी यांनी आपल्या नावापुढे आई,वडिलांचे नाव लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, May 20, 2024

मंगळवेढयाचे गटविकास अधिकारी यांनी आपल्या नावापुढे आई,वडिलांचे नाव लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी प्रथमच आपल्या आईचे व वडिलांचे फलकावर नाव लावल्याने ते मंगळवेढयातील नाव लावणारे पहिले शासकिय अधिकारी ठरले असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शासनाने एक आदेश काढून वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लावावे असा जनरल आदेश काढला आहे. मात्र याची अंमलबजावणी म्हणावी तशी अदयाप झालेली दिसून येत नाही. शासनाने महिलांना आरक्षण देवून स्वावलंबी बनविण्याचा विशेष प्रयत्न केला.त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे वडिलांबरोबर आईचेही नाव लावणे बंधनकारक केले आहे. यापुर्वी प्रथमतः रेशन कार्डावर कुटुंबातील स्त्रीचे नाव देवून प्राधान्य देण्यात आले होते. त्याचबरोबर दाखल्यावर तसेच प्रॉपर्टीवरही स्त्रीयांना नावात प्राधान्य देण्यात आले होते.
या पाठोपाठ आता शासकिय अधिकार्‍यांनी आपल्या नावापुढे आईचे व वडिलांचे नाव लावा असा आदेश निघाला आहे.मंगळवेढयात शासकिय अधिकार्‍यांमध्ये प्रथमच गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी आपल्या नावाच्या पुढे आईचे व वडिलांचे नाव लावल्याने कार्यालयात काम घेवून येणार्‍या नागरिकांचे लक्ष तो फलक खेचून घेत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतर कार्यालयामध्ये अदयाप तरी कुठल्या अधिकार्‍यांनी आपल्या नावापुढे आई,वडीलांचे नाव लावल्याचे निदर्शनास आले नसल्याची खमंग चर्चा होत आहे.

Pages