मंगळवेढा तालुक्यासह ग्रामीण भागात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सोबत पावसाच्या सरी...... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, May 16, 2024

मंगळवेढा तालुक्यासह ग्रामीण भागात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सोबत पावसाच्या सरी......

मंगळवेढा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस;आंबा पिकाचे मोठे नुकसान....
मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यासह ग्रामीण काही भागात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतमालाची झाकपाक करताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. गुरुवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती.दुपारी दोन नंतर आकाशात ढगांची जमवाजमव चालू झाली दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा सह ग्रामीण भागात बहुतांशी भागावर दाट ढगांनी गर्दी केली. लगेचच जोराचा वारा सुटला व विजांचा कडकडाटही जोरात होऊ लागला अखेर चार ते पाचच्या दरम्यान मंगळवेढा शहर परिसरात पावसाला सुरुवात झाली. पाऊस चालू असतानाही जोराचा वारा सुटला व विजांचा कडकडाटही जोरात होऊ लागला.
अचानक आलेल्या वादळी वार्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे झाकपाक करताना शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली तर अनेक ठिकाणी जोराच्या वाऱ्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. जोराच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी कैऱ्यांचा सडा पडलेला दिसत होता.अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी तापमानाचा पारा थोडा खाली आलेला दिसत होता. मागील दोन तीन दिवसापासून पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. बुधवारी देखील काही भागात हलक्या सरी पडल्या.

Pages