मंगळवेढा पोलिसांनी,सांगोला पोलिसाच्या मदतीने तपासणी दरम्यान पकडली १ लाख ४३ हजार ८८० रुपयांची अवैध्य वाहातुक हाेणारी दारू... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, April 14, 2024

मंगळवेढा पोलिसांनी,सांगोला पोलिसाच्या मदतीने तपासणी दरम्यान पकडली १ लाख ४३ हजार ८८० रुपयांची अवैध्य वाहातुक हाेणारी दारू...

मंगळवेढा/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीस धोंडा येथे पोलिसांच्या तपासणी नाक्यावर मंगळवेढा पोलिसांचे पथक तपासणी करीत असताना १ लाख ४३ हजार ८८० रुपयांच्या बेकायदेशीर दारू ची वाहतूक करून कर्तव्यावर आसलेले पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख यांना धक्काबुक्की करून शासकिय कामात आडथळा आनल्या प्रकरणी आरोपी प्रकाश चुडाप्पा शिंदे,शरद मारुती मस्के, स्वप्निल शरद मस्के (रा. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली, आहे.
फिर्याद पोहेकॉ सैफुल अब्दुल रसिद अन्सारी यांनी दिली असून, ही घटना दि.१३ एप्रिल ६:४५ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी दहिवडी शिवारातील चाळीस धोंडा येथे घडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी दहिवडी शिवारातील चाळीस धोंडा येथे मंगळवेढा पोलीस एस.एस.टी. पॉईट जवळ येणारी व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना ,यातील आरोपी नामे प्रकाश चुडाप्पा शिंदे यांने आपले ताब्यातील बोलेरो क्रमांक एम.एच.४५ ए.एल.८४१७ हा गाडीत वेगवेगळ्या प्रकारच्या इंग्लिश दारूच्या १४३८८० रुपयाच्या बाटल्याचे बॉक्स विनापरवाना अवैधरित्या शिवाय गाडीतुन घेवून जात असताना ,पोसई शेख यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने,हाताने धक्काबुकी करुन ढकलुन देवुन शासकीय कामात अडथळा करुन तेथुन बोलेरो गाडी घेवुन हायवे रोडने विरुध्द बाजुने पळुन गेले. मंगळवेढा पोलिसाच्या पथकाने त्यास पाठलाग करुन सांगोला शहरातील धनगर गल्ली येथे सांगोला पोलीस व मंगळवेढा पोलीस यांच्या पथकाने पकडले ,वरील तिघा आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला, बेदरकारपणे वाहन चालविणे व अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे, गुन्हातील बोलेरो जीप जप्त करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहेत.

Pages