मंगळवेढ्यातील तहसीलदार जाधवांची हिटलर शाही.....आंधळगावात पाण्याचा टँकर मागणाऱ्या ग्रामस्थांनाच गुन्हा दाखल करण्याची तहसिलदारची धमकी...... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, April 12, 2024

मंगळवेढ्यातील तहसीलदार जाधवांची हिटलर शाही.....आंधळगावात पाण्याचा टँकर मागणाऱ्या ग्रामस्थांनाच गुन्हा दाखल करण्याची तहसिलदारची धमकी......

ग्रामस्थांनी मुजाेर आधिकार्यावर कारवाईची केली मागणी...
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टँकरची मागणी केली हाेती. दि.12 रोजी तहसीलदार मदन जाधव हे पाणीटंचाई पाहण्यासाठी आंधळगाव येथे आल्यावर ग्रामस्थानी गावाला तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून टँकर त्वरित सुरू करावेत अशी मागणी केली असता चक्क तहसीलदारांनी टँकर सुरू करणार नाही तुम्ही मला सांगणारे कोण? असे म्हणत तुमच्यावर शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पोलिस निरीक्षकांना फोन लावत दोन पोलिस बोलावून घेतल्याने आशा मुजाेर आधिकार्याची तात्काळ उचल बांगडी करून या घटनेची विभागीय चाैकशीची मागणी केली आहे.दरम्यान नागरिकांना पाणी टंचाई जाणवू नये यासाठी सातत्याने धपडणारे लोकप्रतिनिधी आ.समाधान आवताडे,व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आशा मुजाेर आधिकार्यावर काय कारवाई करतात याकडे तमाम नागरिकांचे लक्ष लागून आहे.
मंगळवेढा तालुक्यात सध्या माळ भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना गंभीर तोंड द्यावे लागत आहे अनेक गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. आंधळगाव व नंदुर प्रादेशिक योजना गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत.भोसे प्रादेशिक योजना देखील वारंवार दुरुस्तीच्या कारणा अभावी बंद पडत असते. तसेच अनेक गावात पावसाचे प्रमाण कमी असल्याने येथील जल स्तोत्र पूर्णतः आटलेले आहेत.त्यामुळे अनेक गावासह वाड्यावर पाणीटंचाई जाेर धरत आहे. त्यामुळेअनेक गावांनी प्रशासनाकडे टँकर मागणीचे प्रस्ताव दिले आहेत.येथिल प्रशासन टँकर देन्यास असमर्थता दाखवत आसल्याने नागरीकांच्या घशाला काेरड पडत आहे. दि.12 रोजी तहसीलदार मदन जाधव,गट विकास अधिकारी कदम व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पांडव यांच्या पथकाने टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली.दूपारी २.३० वाजता या पथकाने आंधळगाव येथे पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी नवीन आंधळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाची एम जे पी च्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता त्यांनी काम पूर्ण व्हायला पंधरा दिवस लागणार असल्याचे सांगितले.त्यामुळे उपस्थित नागरिकांनी या योजनेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यापासून आश्वासने दिली जात आसल्याने योजना चालू होईपर्यंत आंधऴगावला टँकरने पाणी पुरवठा करण्याची यावेळी मागणी केली असता तहसीलदार मदन जाधव यांनी मी टँकर सुरू करणार नाही असे मुजाेरपने सांगत तुम्ही टँकरची मागणी करणारे कोण? असे म्हणत तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आनल्याचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देत तातडीने दोन पोलीस बोलावून घेत हुकुमशाही पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या धमकीला भिक न घालता आम्ही ग्रामपंचायतीला कर भरत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करीत आहोत आमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा तो करा? असा इषारा देऊन आशा मुजाेर आधिकार्याची तात्काळ उचल बांगडी करून विभागीय चाैकशी करन्याची मागणी ग्रामस्थांनी करून कारवाई करन्याची मागणी केली आहे. सध्या नागरिकाबरोबर जनावरांना देखील पाणीटंचाई जाणवत असताना पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे, येथील प्रशासनाचे आधिकारी बेजबादारपने कसे वागत आहेत व शासकिय कामात आडथऴा आनल्याचा गून्हा दाखल करन्याची धमकी दिल्याचा नागरीकांचा आराेप आहे. आंधळगांव ग्रामस्थांनी हुकूमशाही व हिटलर शाही कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Pages