मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, February 24, 2024

मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको...

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मंगळवेढा सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईमध्ये सगेसोयरे यांचा आरक्षणामध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते परंतु विशेष अधिवेशनामध्ये सगेसोयऱ्याचा विषय न घेता मागणी नसणारे आरक्षण देऊ केलेले आहे त्यामुळे मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरी नागपूर महामार्गावरती दोन्ही बाजूला भव्य रास्ता रोको करण्यात आला यावेळी दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती.
मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक व तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधींना देण्यात आले या पुढील काळात मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याप्रमाणे सकल मराठा समाजाची दिशा ठरवली जाईल या रास्ता रोको मध्ये सकल मराठा समाजाचे सर्व बांधव उपस्थित होते.

Pages