सांगोला-मंगळवेढा रोडवर जीप व कंटनेरचा अपघात; दोघे जागीच ठार,तर दोन लहान बालके गंभीर जखमी... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, February 28, 2024

सांगोला-मंगळवेढा रोडवर जीप व कंटनेरचा अपघात; दोघे जागीच ठार,तर दोन लहान बालके गंभीर जखमी...

वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा-सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील लेंडवेचिंचाळे येथील ब्रीजवरील रोडवर जड वाहतूक करणारा टेेलर निष्काळजीपणे उभा केल्याने त्या वाहनास ट्रॅक्स जीपची पाठीमागून जोराची धडक लागल्याने गाडीतील चंद्रकांत श्रीमंत कुंभार,संगिता चवडाप्पा कुंभार हे दोघे ठार झाले तर 4 व 5 वर्षाची दोन लहान बालके गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक इंद्रजीतकुमार कृष्णासिंग (मंजोली बिघा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.27 रोजी पहाटे 4 वाजता मंगळवेढा ते सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील लेंडवेचिंचाळे येथील ब्रीज वर जड वाहतूक करणारा मोठा टेलर जी.जे.18 बी.टी.8782 हा उभा होता. या दरम्यान अक्कलकोट येथील जीप क्रमांक के.ए.27 बी.6188 ही कराड वरुन करजगी ता.अक्कलकोट कडे जात असताना अवजड वाहनास पाठीमागून जीपची जोराची धडक लागल्याने गाडीतील चंद्रकांत कुंभार,संगिता कुंभार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी वरील दोघांना तपासून उपचारापुर्वीच ते मयत झाल्याचे घोषीत केले.
जड वाहतूक टेलर स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे सार्वजनिक रोड वर उभा करुन सुचना फलक व इंडिकेटर न लावता धोकादायक स्थितीत उभे केल्याने दोघांचा मृत्यू तर लहान बालक शंकर चवडाप्पा कुंभार (वय 4) व मुलगी श्रावणी कुंभार (वय5) यांना गंभीर दुख:पत करुन जीपगाडीचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चवडाप्पा बसवराज कुंभार (रा.गौडगाव ता.अक्कलकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अवजड वाहतूक चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Pages