प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना :- पालकमंत्री चंद्रकांत पाटील - Divyaprabhat News

Breaking News

Friday, February 23, 2024

प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना :- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

‘आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव’ वितरण सोहळा संपन्न...
पंढरपूर/प्रतिनिधी
गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असते. शासनाच्या विविध योजनांच्या प्राप्त निधीची योग्य वापर करून गावााचा विकास करावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.
सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे "आर.आर.( आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार", अमृत महाआवास अभियान पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणाचा सोहळा आज यश पॅलेस, कोर्टी रोड, पंढरपूर येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हास्तरावरील पुरस्कारप्राप्त माढा तालुक्यातील वडाचीवाडी आऊ व तालुकास्तरावरील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, उपमुख्याधिकारी ईधाधिन शेळकंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील गावे राज्यासाठी आदर्श निर्माण करणारे व्हावेत असा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वयातून गावाच्या विकासासाठी नियोजन करावे. प्रत्येक गाव सुंदर व सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनामार्फत ग्रामीण भागातील दलित मागासवर्गीय लोकांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता केली जाते.दलित वस्ती सुधार योजनेचा निधी त्याच कामासाठी वापर करुन रस्ते, वीज, पाणी आदी पायभुत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच जून 2024 सालापासून राज्यातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाहीत. विविध अभ्यासक्रमासाठी ही सवलत लागू राहणार असून विद्यार्थिनींनी या शैक्षणिक सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
आमदार समाधान आवताडे म्हणाले, पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी‌ आणखी जोमाने काम करुन राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांनी परिसरातील इतर ग्रामपंचायतींना याबाबत मार्गदर्शन करावे.त्याच बरोबर प्रत्येक गावात सौर उर्जा प्रकल्प राबवावेत असे आवाहनही त्यांनी केले.
अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर म्हणाले, पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत निधी तसेच त्यांना मिळणारा इतर शासकीय योजनांच्या निधीचा पुरेपूर वापर करून ग्रामपंचायत हद्दीत विकास केला आहे. जिल्ह्यात विविध योजनेमधून 76 हजार घरकुले मंजूर असून त्यामध्ये 56 हजार घरकुले पुर्ण झाली आहेत. तर 20 हजार घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यात जिल्हापरिषदेच्या विविध विभागाच्या माध्यमातून रस्ते, पाणी,स्वच्छता अभियान, घरकुल योजना आदी विकास जोमाने सुरु असल्याचे सांगितले. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून शिकण्यासाठी जिल्ह्यातील 112 शाळांना ग्रंथालयासाठी 41 हजार पुस्तके सीएसआर फंडातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून उपलब्ध करण्यात आली असून, लक्ष्मी टाकळी (ता.पंढरपूर ) येथील शाळेला प्राथनिधिक स्वरुपात पुस्तके पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते देण्यात आली
तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती- अक्कलकोट- वागदरी, बार्शी- अंबाबाईचीवाडी, करमाळा- खडकी ,माढा -वडाचीवाडी आऊ, माळशिरस- पुरंदावडे, मंगळवेढा- बालाजीनगर (लमान तांडा), मोहोळ -आष्टी, उत्तर सोलापूर- कौठाळी, पंढरपूर- तिसंगी, सांगोला -वाकी शिवणे, दक्षिण सोलापूर- दिंडूर

Pages