मंगळवेढा आगारात आजपासून एसटीचे सुरक्षितता अभियान :- संजय भोसले - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, January 11, 2024

मंगळवेढा आगारात आजपासून एसटीचे सुरक्षितता अभियान :- संजय भोसले

मंगळवेढा/प्रतिनिधी
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ते सुरक्षितता मोहिम राबविण्यात येते रस्ते वाहतूकीत सुरक्षित प्रवास अंत्यत महत्वाचा भाग आहे. त्याप्रमाणे राज्य परिवहन महामंडळ मंगळवेढा आगारामार्फत सुरक्षितता मोहिम सन 2024 अंतर्गत दि.11 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत सुरक्षितता मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि.11 जानेवारी 2024 रोजी मंगळवेढा आगारात सदर मोहिमेचे उदघाटन मा.सारंग पुजारी,प्राध्यापक शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मंगळवेढा यांचेतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक मा.संजय भोसले हे उपस्थित होते.
याप्रसंगी मंगळवेढा आगाराचे पालक अधिकारी मा.सदाशिव कदम (विभागीय वाहतूक अधिक्षक, सोलापूर विभाग) तसेच सहाय्यक वाहतूक अधिक्षक मा.शरद वाघमारे,वाहतूक निरिक्षक मा.योगेश गवळी,प्रमुख कारागीर मा.तुकाराम माने हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात आगारातील 20 वर्षे, 15 वर्षे विनाअपघात सुरक्षित सेवा केलेल्या चालकांचे अभिनंदन करुन त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा.सारंग पुजारी यांनी आगारातील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी यांना सुरक्षितता मोहिमेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. चालक,वाहक तसेच यांत्रिक कर्मचारी यांना दैनंदिन कामकाज करित असताना सुरक्षितता बाळगून रा.प.सेवा करण्यात यावी तसेच वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत मार्गदर्शन केले. तसेच पालक अधिकारी श्री.सदाशिव कदम यांनी चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी यांनी सदर मोहिमेत सुरक्षितता बाळगून दैनंदिन कामकाज करावे व वर्षभर सुरक्षितता मोहिम राबवावी असे मार्गदर्शन केले. अपघाताचे कारण,अपघाताचे प्रकार, अपघात होवू नये याकरिता चालक,वाहक व यांत्रिक कर्मचारी यांनी घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच रा.प.महामंडळ चालक व वाहकांकरिता राबविण्यात येते असलेले उपक्रम , आरोग्य तपासणी मोहिम याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे गतवर्षी झालेल्या अपघाताची टक्केवारी विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक (प्रशासन) मा.अमोल काळे व आभार प्रदर्शन सहाय्यक वाहतूक अधिक्षक मा.शरद वाघमारे यांनी केले. सुरक्षितता मोहिम उद्घाटन कार्यक्रमास आगारातील प्रशासकिय, चालक,वाहक व यांत्रिक कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Pages