अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन 25 वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून झोपेत केला खून... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, January 12, 2024

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन 25 वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून झोपेत केला खून...

सहा तासाच्या आत आरोपीला जेरबंद करन्यात पाेलीसांना यश...
मंगळवेढा/प्रतिनिधी
शहरानजीक वीट भट्टीवर कामावर असलेल्या आपल्या पत्नीचा अन्य एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन त्या स्त्रीच्या पतीने 25 वर्षीय तरुणाचा झोपेत डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अर्जून गोरख शेगर (रा.पळसदेव ता.इंदापूर) याला पोलीसांनी अवघ्या 6 तासात अटक केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, जुना बोराळे नाक्याजवळ मकानदार यांची वीटभट्टी असून येथे मयत ज्ञानेश्वर उर्फ माऊली महादेव शिंदे (वय 25 रा.माळशिरस) हा येथे वीट भट्टीवर कामास होता. यातील आरोपी अर्जून गोरख शेगर व त्याची पत्नीही तेथे कामास होती. मयत व आरोपी हे नातेवाईक असून आरोपीची पत्नी व मयत यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन दि.11 रोजी सकाळी 7 वाजता मयत हा घराच्या अंगणात झोपलेल्या ठिकाणी त्याच्या डोकीत उजव्या बाजूला मोठा दगड घालून डोकीत दुखापत करुन खून केल्याची फिर्याद रतन उर्फ रुपाबाई महादेव शिंदे (रा.माळशिरस) यांनी दिल्यावर पोलीसांनी आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून केवळ 6 तासात आरोपीला जेरबंद करण्याची विशेष कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड,पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केली आहे. दरम्यान या खूनाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने हे करीत आहेत.

Pages