डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सतीश भाऊ सावंत यांची निवड...... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, January 7, 2024

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सतीश भाऊ सावंत यांची निवड......

सांगोला/प्रतिनिधी
राज्यातील सर्वात मोठी असलेली संघटना म्हणजे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सांगोल्याचे सतीशभाऊ सावंत यांची निवड करण्यात आली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यातील जेष्ठ विचारवंत ,ज्येष्ठ संपादक राजा माने साहेब यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे
डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकाची ही जोपासण्यासाठी आणि या माध्यमाला सामाजिक मूल्य तसेच सामाजिक जबाबदारीच्या चौकटीत कार्यरत करण्यासाठी सदैव कार्यशील असल्यामुळे व संघटनेच्या स्थापनेपासून संघटना बळकट करून संघटना वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे सतीश भाऊ यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यातील जेष्ठ विचारवंत ज्येष्ठ संपादक राजा माने साहेब यांनी राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. सतीश भाऊ सावंत यांनी अनेक नवोदित पत्रकार तयार केले आहेत परखड व्यक्तिमत्व व निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे निवडीनंतर सतीश भाऊ सावंत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आह.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सतीश भाऊ सावंत यांनी राज्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व सभासदांना न्याय देऊन त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्याचा प्रयत्न करू व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही चळवळ व संघटना बळकट करू असे सांगितले

Pages