शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटखळ येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, January 26, 2024

शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटखळ येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.....

मंगळवेढा/प्रतिनिधी
शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटखळ येथे आज 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पाटखळ गावचे उपसरपंच तानाजी गोडसे माजी उपसरपंच ,समाधान गडदे,युवा उद्योजक हनुमंत गडदे,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खुळे (महाराज),प्रदीप पवार,विश्वास खुळे,रामेश्वर ताड,सुखदेव चव्हाण(मेजर),तुकाराम चव्हाण(मेजर),युवक नेते बापुसाहेब मेटकरी,आप्पासाहेब मेटकरी,युवा उद्योजक समाधान इंगोले,तानाजी मेटकरी,कांबळे मेजर,डॉक्टर पाटील,बापू सावत,माजी विद्यार्थी शिवाजी अवताडे, शंकर अवताडे,पांडुरंग अवताडे, रोहित डांगे,शुभम डांगे,समाधान खडतरे,उद्योजक राहुल मोरे,आनंद कोळेकर तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य मा.महेंद्र शिंदे(सर)यांनी प्रास्ताविक केले,काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच देशभक्तीपर गीते व रेकॉर्ड डान्स करण्यात आले.युवक नेते बापुसाहेब मेटकरी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच समाधान गडदे यांच्याकडून विद्यार्थ्यांना पेपर पॅड वाटण्यात आले,युवा उद्योजक समाधान इंगोले यांच्यातर्फे वह्या वाटप करण्यात आले,शेवटी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.तसेच सर्व ग्रामस्थ व प्रतिष्ठित व्यक्ती,मान्यवरांचे प्रशालेतर्फे व शेजाळ सर याने आभार मानले या कार्यक्रमासाठी प्राचार्य, सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले उपस्थित होते.

Pages