बनावट सही प्रकरणातील आरोपी दीड महिना उलटूनही मंगळवेढा पोलिसांना सापडेनात.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, December 2, 2023

बनावट सही प्रकरणातील आरोपी दीड महिना उलटूनही मंगळवेढा पोलिसांना सापडेनात....

राजकीय दबावापोटी अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा
.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
श्री.विद्या विकास मंडळ ही संस्था आपल्या गटाच्या ताब्यात राहावी यासाठी रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा,संस्थेचे अध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या शुभदा शहा, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील,सचिव किसन गवळी यांनी संगनमत करून खोट्या सह्या करून चेंज रिपोर्ट बनवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होवून दीड महिना उलटून गेला तरीही संशयित आरोपी ना अटक झाली नाही. ते राजकीय क्षेत्राशी संबधित असल्याने पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. याप्रकरणी पोलिस संशयित आरोपींना पाठीशी घालत असून सर्वसामान्य नागरिकांवर कोणताही गुन्हा दाखल झाल्यास तत्काळ अटक करणारे पोलिस मात्र यातील आरोपींना पकडण्यास दूजाभाव करीत असल्याने त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी फिर्यादी अँड.रमेश जोशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
मंगळवेढा तालुक्यात राजकीय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या शहा कुटुंब संपन्न आहे. वडील, आजोबा यांचे सामाजिक कार्य आहे असे असताना संस्था आपल्या ताब्यात राहिली पाहिजे हा अट्टाहास एका प्रशासकीय अधिकाऱ्याने करण्याचे डाव रचून दिल्याचे बोलले जात आहे. यातील रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असून ते प्रांतिक सदस्य आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी रतनचंद शहा बँकेत गैरव्यवहार झाल्या प्रकरणी बँकेच्या एका कर्मचाऱ्यांनी आपण शहा यांना पैसे दिल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये फिरत होती. त्यानंतर बँकेतील गैरव्यवहार समोर आला होता त्यातील कर्मचारी सद्या जेल मधे असून ज्याच्यावर त्या कर्मचाऱ्याने आरोप केले ते मात्र बाहेर आहेत.
विद्या विकास मंडळाचे अँड.रमेश जोशी सचिव असताना त्यांच्या खोट्या सह्या उपरोक्त चौघांनी करण्याचे धाडस दाखवून शासनाची, सोलापूर विद्यापीठाची, संस्थेच्या संस्थापक सभासदांची फसवणूक करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होवून दीड महिना झाला असला तरी एकही संशयित ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. दरम्यान या प्रकरणातील प्रमुख संशयित व हे सर्व घडवण्यासाठी पुढाकार घेतल्या ची चर्चा असलेले शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामीन मागितला आहे. परंतु त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे शहा यांना अद्यापपर्यंत दिलासा मिळाला नाही. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी बोराळे, कर्नाटक मधील इंडी विजापूर, बारामती, ठाणे, पुणे या भागात पोलीस जाऊन आले असल्याचे समजते. संबधित संशयित आरोपी हे राजकीय क्षेत्राशी संबधित असल्याने त्यांना अजून अटक होत नाही. यामागे राजकीय दबाव आहे कि पोलिसांची कर्तव्य प्रती असलेली उदासीनता याबाबत नागरिक चर्चा करीत आहेत. एकीकडे लहानसहान गुन्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना ज्या तडफेने पोलिस तत्काळ कारवाई करतात तिच तडफ, कामाचा जोश पोलिस राजकिय लोकांच्या गुन्ह्याबद्दल का दाखवत नाहीत.
पोलिसांच्या या वेळकाढू भूमिकेबाबत फिर्यादी अँड.रमेश जोशी यानी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच माझ्या बोगस सह्या करून बनावट चेंज रिपोर्ट बनवल्या प्रकरणातील संशयित आरोपींना तत्काळ अटक करावी यासाठी पोलिस अधीक्षकांना भेटून कारवाईची मागणी केली आहे
.

Pages