पीक विमा मुदतवाढीमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा..... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, December 2, 2023

पीक विमा मुदतवाढीमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा.....

आंबा,काजू, संत्रा ही फळपीके व रब्बी ज्वारी साठी शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा पोर्टल दि.चार व पाच डिसेंबर २०२३ रोजी सुरू राहणार आहे.योजनेत आंबा, काजू, संत्रा, रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दि.३० नोव्हेंबर २०२३ असा होता.
पिक विमा पोर्टल मधील काही समस्यांमुळे विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले.त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता देऊन आता दि. चार व पाच डिसेंबर 2023 असे दोन अतिरिक्त (वाढीव) दिवस पिक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे. तरी राज्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

Pages