वाघाच्या अफवेमुळे दहशत...वाघ आला रे स्टेटस ठेवून दहशत पसरविल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, November 20, 2023

वाघाच्या अफवेमुळे दहशत...वाघ आला रे स्टेटस ठेवून दहशत पसरविल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल.....

सागोला/प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावात वाघ आल्याचा मोबाईलवर स्टेटस ठेवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणून सांगोला पोलिसात एकावर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सांगोला पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महूद भागामध्ये वाघ आला आहे,
असा मोबाईलवर स्टेटस ठेवून दहशत पसरवली म्हणून सांगोला वन विभागातील वनपाल सुग्रीव मुंडे यांनी पोलिसात फिर्याद दिली. शैलेश कांबळे (रा. मेटकरवाडी,महूद) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पो. ना. पाटील करीत आहेत. दरम्यान, चिकमहृद परिसरात अद्यापपर्यंत बिबट्या अथवा पट्टेरी वाघ आढळला नाही.
सुरक्षिततेचे उपाय राबविले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी वन कर्मचारी जागृती करत आहेत. अफवा पसरविणाऱ्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम जाधवर यांनी सांगितले
.

Pages