पाटखळ उपसरपंच यांनी दिलेला शब्द पाळला ; नूतन उपसरपंच पदी तानाजी गोडसे यांची निवड.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, October 30, 2023

पाटखळ उपसरपंच यांनी दिलेला शब्द पाळला ; नूतन उपसरपंच पदी तानाजी गोडसे यांची निवड....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील ग्रामपंचायत निवडणूक होऊन एक वर्ष पुर्ण झाले व ठरल्याप्रमाणे वर्षाला उपसरपंच पद बदलण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले होते त्याप्रमाणेच उपसरपंच ताई गडदे यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा देऊन नवीन उपसरपंच पदाला संधी देऊन गावासमोर आदर्श निर्माण केला आहे व गावातून त्याचे कौतुक केले जात आहे.
पाठखळ/मेटकरवाडी ग्रामपंचायती च्या उपसरपंच पदी सिध्देश्वर आवताडे गटाचे तानाजी गोडसे यांची निवड झाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी प्रदीप पवार यांचा 1 मतांनी पराभव केला.पाटखळ मेटकरवाडी उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया दि.30 रोजी पार पडली. उपसरपंच पदासाठी तानाजी गोडसे व प्रदीप पवार यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये तानाजी गोडसे यांना सहा मते मिळाली व प्रदीप पवार यांना पाच मते मिळाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य 11 यांनी मतदानाचा हक्क बजावला.
ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच ऋतुराज बिले व ग्रामसेवक अरुण मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंच ऋतुराज बिले व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन उपसरपंच तानाजी गोडसे यांची निवड झाली. यावेळी पार्टी प्रमुख बिरा गडदे, बापूसाहेब वाघमोडे, उत्तम वाघमोडे, हनुमंत गडदे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खुळे, बंडू काळे, उपसरपंच ताई गडदे, समाधान गडदे,माळाप्पा कोळेकर, अंकुश खुळे,भारत खुळे,मनोहर सावंत,बाळू बोडरे,समाधान खुळे, शिवाजी गडदे, तेजस चव्हाण, प्रवीण लेंडवे, विशाल चव्हाण, विनायक गडदे, दत्ता माने, समाधान पवार,अविनाश खुळे,माऊली कोळेकर, दिगंबर माने, उपस्थित होते. निवडी नंतर तालुक्याचे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हॉइस चेअरमन बबनराव अवताडे यांच्या हस्ते खरेदी विक्री संघ मंगळवेढा येथे करण्यात आला.
आमचे ठरले होते उपसरपंच पद वर्षीला नवीन चेहऱ्याला संधी द्यायची त्याच प्रमाणे आम्ही दिलेला शब्द सत्यत उतरला. पार्टी प्रमुख बिरा गडदे

Pages