ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रारूप मतदार यादी आज प्रसिध्द होणार.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, August 10, 2023

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रारूप मतदार यादी आज प्रसिध्द होणार....

दिव्य न्यूज नेटवर्क
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 करीता एकूण 28 ग्रामपंचायत मध्ये प्रारूप मतदार यादी आज गुरुवार दि.10 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार असून ती ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात ही नागरिकांना पाहण्यास उपलब्ध असेल. असे मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मंगळवेढा तालुक्यात एकूण 27 ग्रामपंचायत व 1 पोट निवडणूक अशा एकूण 28 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकी साठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. खालीलप्रमाणे गावे शिरसी,आंधळगाव,खडकी,अकोले,जंगलगी,खुपसंगी,जुनोनी,महमदाबाद हु,बठाण,शैलेवाडी,उचेठाण,बम्हपुरी,निंबोणी,जालीहाळ सि,मुठेवाडी,भाळवणी,चिक्कलगी,नंदुर,हिवरगाव,रडडे,लक्ष्मी दहिवडी,लोणार,मानेवाडी,पडोळरकवाडी,रेवेवाडी,देगांव,डीकसळ,लमाणतांडा(पो.नि) आहेत.व नागरिकांनी सदर प्रारूप मतदार यादी तपासून त्यावरील त्यांचे लेखी स्वरूपातील हरकत अर्ज दि.21 ऑगस्ट 2023 पर्यंत तहसील कार्यालयातील मंगळवेढा येथे ग्रामपंचायत निवडणूक विभाग शाखेमध्ये स्वीकारले जातील. त्यानंतर त्या सर्व हरकत अर्जांवर सविस्तर चौकशी करून अंतिम मतदार यादी शुक्रवार दि.25 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.तरी नागरिकांनी प्रारूप मतदार यादीचे अवलोकन करावे असे आवाहन मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

Pages