पाठखळ सजेचा कार्यभार अर्चना लोखंडे यांनी स्विकारला.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, August 9, 2023

पाठखळ सजेचा कार्यभार अर्चना लोखंडे यांनी स्विकारला....

नागरिकांची वेळेत कामे पुर्ण करणार .....
दिव्य न्युज नेटवर्क
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ सजेच्या तलाठी अर्चना धोंडीराम लोखंडे यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला असून शेतकर्‍यांची व नागरिकांची वेळेत कामे केली जातील असे प्रसारमाध्यमांसी बोलताना व्यक्त केले.
तलाठी अर्चना लोखंडे ह्या उदनवाडी ता.सांगोला येथे कार्यरत होत्या. नुकत्याच महसूल प्रशासनाने बदल्या केल्याने त्या पाठखळ येथे बदली होवून आल्या आहेत. त्या मुळच्या मुंबई येथील आहेत. सन 2011 मध्ये तलाठी परीक्षा पास होवून सेवेत आल्या असून पहिली नेमणूक त्यांची एखतपूर सजेत झाली. तद्नंतर त्यांनी वाटंबरे, चिणके,उदनवाडी येथील सजेत कार्यरत होत्या.दरम्यान नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला असून शेतकरी व नागरिकांना वेळेत त्यांची कामे पुर्ण केली जातील असे त्यांनी कार्यभार स्विकारते प्रसंगी उपस्थितांना आश्वासन दिले. एक महिला तलाठी सजेला मिळाल्यामुळे पाठखळ ग्रामस्थांमधून समाधना व्यक्त होत आहे.

Pages