आज मंगळवेढा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे जंगी स्वागत :- चेअरमन अभिजीत पाटील - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 13, 2023

आज मंगळवेढा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे जंगी स्वागत :- चेअरमन अभिजीत पाटील

मंगळवेढा /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस मधील झालेल्या फुटी नंतर शरदचंद्रजी पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच दौरा असणार आहे. सोलापूर येथील कार्यक्रम झाल्यानंतर सांगोलाकडे रवाना होत असताना मंगळवेढा नगरीत शरदचंद्रजी पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
मंगळवेढा तालुका ग्रामीण भागात शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांना मानणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते व नेतेमंडळी यांनी जोरदार तयारी केली असल्याचे माध्यमाशी बोलताना श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी शरदचंद्रजी पवार यांना मानणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शिवप्रेमी चौक मंगळवेढा येथे जंगी स्वागतासाठी येण्याचे आवाहन केले आहे.
खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज मंगळवेढा येथे दुपारी १२ वाजता माचाणूर चौक येथे स्वागत व तिथून (शेतकरी हाॅटेल पासून) रॅली निघेल. तसेच मंगळवेढा शहरा लगत पहिल्या ब्रीज पासून बोराळ नाक्यापासून दामाजी चौकाकडे रवाना होऊन दामाजी चौक येथे आगमन होणार आहे. तसेच शिवप्रेमी चौकात सत्कार समारंभाचे आयोजन असल्याचे सांगितले आहे.

Pages