धक्कादायक :- तळसंगी येथे अवैध दारू विक्रेत्यांचे चक्क किराणा दुकानात दारू विक्री..... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, July 23, 2023

धक्कादायक :- तळसंगी येथे अवैध दारू विक्रेत्यांचे चक्क किराणा दुकानात दारू विक्री.....

महिलेविरूध्द गुन्हा दाखल....<
/b>
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील बबलू किराणा स्टोअर्समध्ये बेकायदा दारू विक्री करणार्‍या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून 1400 रुपये किमतीची दारू जप्त करीत दारू विक्रेता महिला रुपाली विजय महानूर(वय 31) हिच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची हकिकत अशी,अवैध धंदयावर कारवाई करण्याचे फर्मान प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी दिल्याने बोराळे दुरक्षेत्रात सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे,पोलिस हवालदार महेश कोळी असे कारवाईची मोहिम राबविताना तळसंगी येथील बबलू किराणा स्टोअर्समध्ये एक महिला चक्क दुकानात दारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी जावून खात्री केल्यावर यातील आरोपी रुपाली महानूर हिने पिशवीमध्ये 1400 रुपये किमतीच्या 20 देशी संत्रा बाटल्या बेकायदेशीररित्या ठेवून त्याची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी सदर दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.दरम्यान चक्क दारू किराणा दुकानात अन्य साहित्यासोबत विक्रीस ठेवल्याने नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त होत असून या दुकानदारांना पोलिस खात्याची भिती आहे की नाही असा संतापजनक सवाल केला जात आहे.

Pages