मंगळवेढ्यात सहा कोतवालच्या जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर..... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, July 21, 2023

मंगळवेढ्यात सहा कोतवालच्या जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर.....

मंगळवेढ्यात कोतवाल पदभरती या पद्धतीने होणार....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तहसिल कार्यालयात गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता सहा गावच्या कोतवाल पद नियुक्ती साठी जात प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. दरम्यान या आरक्षण मुळे अनेक इच्छुक उपस्थित असलेल्या तरुण युवकांच्या आशेवर पाणी पडल्याची चर्चा होती.यावेळी समितीचे अध्यक्ष प्रांत अधिकारी आप्पासो संमिदर,सचिव तहसिलदार मदन जाधव, सदस्य गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, सदस्य समाजकल्याण प्रतिनिधी रामचंद्र हेंबाडे आदींच्या उपस्थितीत कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. दरम्यान सहावी इयत्तेत शिकणार्‍या अथर्व काळे याच्या हस्ते सर्व उपस्थितांच्या समोर आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
यामध्ये कोतवाल पदासाठी गावनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे-मरवडे (सर्वसाधारण), रड्डे (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक), मुढवी-धर्मगाव (अराखीव स्त्री), नंदेश्वर (इतर मागास वर्ग), मंगळवेढा (भटक्या जमाती क),मारापूर-शेलेवाडी (अनुसूचित जमाती स्त्री) आदी प्रमाणे आरक्षण आहे. दि.24 जुलै ते 31 जुलै कार्यालयीन वेळेत सुट्टी वगळून अर्ज वाटप व स्विकारले जातील, परीक्षा शुल्क आरक्षीत प्रवर्गासाठी 300 रुपये व खुला प्रवर्गासाठी 500 रुपये. अर्जाची छाननी दि.1 ऑगस्ट रोजी, पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे 2 ऑगस्ट रोजी, परीक्षेचे स्वरुप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी 50 प्रश्नांची लेखी परीक्षा असून दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या परीक्षा पार पडणार आहेत. दि.9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 नंतर उमेदवारांची निवड यादी तहसिल कार्यालयातील बोर्डावर डकविण्यात येईल असे सांगण्यात आले
.
कोतवाल पदासाठी शैक्षणिक पात्रता चौथी उत्तीर्ण असावा, तसेच तो संबंधीत सजामधील रहिवाशी असणे आवश्यक आहे. जागा ज्या प्रवर्गासाठी राखीव आहे, त्या प्रवर्गाचे उमेदवार असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय जाहिरनामा प्रसिध्दे केल्याच्या दिनांकापासून 18 पेक्षा कमी व 40 पेक्षा जास्त असू नये. अर्ज उमेदवारांनी स्वत: हजर राहून सादर करावा. 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 50 प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानुसार गुणवत्तेप्रमाणे निवड करण्यात येईल. राखीव जागेवर अर्ज भरणारांनी सक्षम अधिकार्‍याने दिलेल्या जातीच्या दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. नियुक्तीच्यावेळेस जात प्रमाणपत्राची मुळ प्रत सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही गुन्ह्यात दंड अगर शिक्षा झालेली नसावी. तसेच पोलीस प्रशासनाचा चारित्र्य दाखला सादर करणे आवश्यक आहे. कोतवाल पदावर काम करणेस सक्षम असलेचा आरोग्य अधिकारी,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक केंद्र येथील वैद्यकीय अधिकार्‍यांचा दाखला जोडणे आवश्यक,अर्जदाराने अर्जात खोटी अगर चुकीची माहिती सादर केल्यास झालेली नियुक्ती रद्द करण्यात येईल. अर्जदारास दि.28 मार्च 2005 व तद्नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास तो अपात्र राहील. कोतवाल हे पद अवर्गीकृत असल्याने दरमहा शासनाच्या नियमानुसार मानधन देय राहील. नियुक्ती झालेनंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
सदरची भरती प्रक्रिया तालुका निवड समितीचा व जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम राहिल. अर्जदाराने अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावीत. शैक्षणीक पात्रतेच्या कागदपत्राची सत्य प्रत. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखल्याची सत्य प्रत, जातीच्या प्रमाणपत्राची सत्य प्रत, उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे (एनसीएल) नॉनक्रिमेलियर प्रमाणपत्राची सत्य प्रत (महिलासह), स्वत:चे पासपोर्ट आकाराचे काढलेले तीन फोटो अर्जावर डकविणे, तसेच अर्जावर दहा रुपये कोर्ट फी स्टॅम्प आवश्यक असल्याचे सचिव तथा तहसिलदार मदन जाधव यांनी आवाहन केले आहे.यावेळी आरक्षण सोडत प्रसंगी नायब तहसिलदार दिपक साळुंखे, प्रशिक्षणार्थी नायब तहसिलदार सायली जाधव,पत्रकार शिवाजी पुजारी, पुरवठा विभागाचे शिवाजी भोसले, सहा गावातील इच्छुक उमेदवार आदी उपस्थित होते.

Pages