मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील भिमा नदीतून काढलेल्या बेकायदेशीर वाळूची कारवाई न करण्यासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.श्रीमंत मसाजी भालेराव, वय ५० वर्ष पद बठाण ग्रामपंचायत कर्मचारी, रा. मु.पो. बठाण, मंगळवेढा, जि. सोलापूर. व गजानन शंकरराव चाफेकर, वय-३२ वर्षे, पद तलाठी सज्जा मुडवी तसेच अतिरिक्त कार्यभार सजा बठाण, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, मूळ रा. मु.पो. उमरबटी, ता. मुखेड, जि. नांदेड. सध्या रा. बाजारसमितीच्या पाठीमागे राजु पाटील यांचे घरी भाड्याने मंगळवेढा, जि. सोलापूर यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
यातील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम चालू असून, बांधकामासाठी वाळु कमी पडल्याने, तक्रारदार यांनी त्यांचे गावाजवळुन मौजे बठाण हदीतून जाणान्या नदीतून वाळू काढल्यामुळे तक्रारदार यांच्यावर याची कारवाई न करण्यासाठी म्हणून ५०००/- रुपये लाचेची मागणी केली म्हणून तक्रार प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारी नुसार केलेल्या पडताळणीमध्ये यातील आलोसे क्र. ०१०२ यांनी कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५०००/- रुपये लाचेची मागणी करून, ते स्विकारण्याचे मान्य केले.
त्यामुळे आज दि. १७/०७/२०२३ रोजी सापळा फारवाईमध्ये यातील आलोसे क्र. ०१ यांनी लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आलोसे क्रं. ०१ व ०२ यांना ताब्यात घेण्यात आले असुन, मंगळवेढा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर, पोलीस अंमलदार पोह प्रमोद पकाले, पोना संतोष नरोटे, पोकों गजानन किणगी, चापोह राहुल गायकवाड, नेम एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे
Monday, July 17, 2023

Home
मंगळवेढा विशेष
मंगळवेढ्यात पाच हजाराची लाच घेताना ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात....