मंगळवेढा :- प्रशिक्षार्थी महिला पोलिस अधिकार्‍यांनी जुगार अड्डयावर छापा टाकून मुख्य बुकीचालकासह मंगळवेढा,पंढरपूर,मोहोळ,जत आदी ठिकाणच्या 61 एजंटाविरूध्द गुन्हे दाखल.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, July 15, 2023

मंगळवेढा :- प्रशिक्षार्थी महिला पोलिस अधिकार्‍यांनी जुगार अड्डयावर छापा टाकून मुख्य बुकीचालकासह मंगळवेढा,पंढरपूर,मोहोळ,जत आदी ठिकाणच्या 61 एजंटाविरूध्द गुन्हे दाखल....

या कारवाईमुळे अवैध व्यवसाईकामधून माेठी खळबळ....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथील बुकीचालक सिध्देश्‍वर ज्ञानेश्‍वर सलगर याच्या शेतातील एका खोलीत त्याच्या साथीदारासह मोबाईलवर एजंटांकडून अंदाजे आकडयावर कल्याण,मुंबई नावाचा मटका जुगारावर पैशाची पैज लावून स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी खेळत असलेल्या ठिकाणावर प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक नयोमी साटम यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून संगणकासह जुगार साहित्य जप्त करून मंगळवेढा,जत,पंढरपूर,मोहोळ भागातील 61 एजंटाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत,मंगळवेढयाच्या पोलिस दलात एवढी मोठी कारवाई प्रथमच झाल्याने अवैध धंदे करणार्‍याचे धाबे दणाणले आहेत.
या घटनेची हकिकत अशी,दि.14 रोजी सायंकाळी 6.50 वा.मल्लेवाडी येथे मटका बुकीचालक सिध्देश्‍वर सलगर याच्या शेतातील एका खोलीत कल्याण,मुंबई नावाचा मटका जुगार अड्डा मंगळवेढा,जत,पंढरपूर,मोहोळ तालुक्यातील एजंटाला हाताशी धरून चालत असल्याची माहिती पोलिस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने तेथे छापा टाकला.यावेळी त्यांना तेथे मोबाईल,प्रिंटर,संगणक,पेन,कागद व इतर जुगाराचे साहित्य मिळून आले. अधिक चौकशी केली असता बुकीचालक हे मोबाईलवर आपले एजंटाकडून येणारे अंदाजे अंक आकडयावर मुंबई मटका नावाच्या जुगारावर पैशाची पैज लावून घेत असल्याची माहिती स्पष्ट झाली.यावेळी बुकीचालक सलगर याच्या मदतीला सुभाष घोगरे,महादेव ढेकळे,बिभीषण सलगर,तानाजी मेटकरी,संभाजी ढेकळे,सुरेश हजारे असे घटनास्थळी मिळून आले. त्यांची झडती घेतली असता 15 हजार रुपये इतकी रोख रक्कम मिळून आली.तसेच काही मोटर सायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत.मटका कोण चालवतो याबाबत चौकशी केली असता सिध्देश्‍वर सलगर हा मुख्य बुकीचालक असल्याचे सांगण्यात येवून नेमलेले एजंट तथा आरोपी पुढीलप्रमाणे-दादा जावीर लोणार,उमेश काटे हुलजंती,सय्यद संख जत,माला शेख जत,तम्मा जाडरबोबलाद,ज्ञानेश्‍वर सुरवसे मंगळवेढा,दिलीप कोष्टी मंगळवेढा,दादा गोडसे शरदनगर,सलगर,निंबाणी,अनिल मदने मंगळवेढा,एस.टी.न्यूव संख,भाऊसोा गरंडे नंदेश्‍वर,आनंदा घुले मरवडे,तानाजी साळुंखे बोराळे,जावेद बोराळे,एम एस संख,धनाजी भोसले भोसे,एन.बी. न्यूव संख,मय्या खांडेकर निंबोणी,अनिल बनसोडे रड्डे,शुभम ताटे जाडरबोबलाद,बाळू साबळे बोराळे,संभाजी मस्के खडकी,डिगू जाडरबोबलाद,मुनाफ करजगी,आर के. जाधव मारापूर,मणेरी सलगर बु,अहमद न्यू, मंगळवेढा,बाबासाहेब मस्के ढवळस,बाळू सावंत मंगळवेढा,इसाक शेख करजगी,राजू खिलारे भिवरगी,रामचंद्र काळे खोमनाळ,नाना जाधव हुलजंती,शिवा कदम माडग्याळ,राम कदम अनगर,महेश चौगुले हुन्नूर,अस्लम चौधरी हुन्नूर,दत्ता काशिद मंगळवेढा,आण्णा भोसले पंढरपूर,दादा चव्हाण पंढरपूर,पप्पू गवळी मंगळवेढा,रियाज मणेरी सलगर बु.श्रीशैल्य कोळी अंकलगी,महेंद्र जाधव,मंगळवेढा,नितीन नवत्रे रड्डे,तिपण्णा कोळी अंकलगी,संगप्पा खिलारे बोबलाद,विष्णू चोपडे शिरनांदगी,शंकर चव्हाण आंधळगांव,अशपाक शेख करजगी,प्रकाश काटे जाडदबोबलाद,इराप्पा चव्हाण अंकलगी,बसू बिराजदार संख,सुनिल कानडे तळसंगी,अशोक पवार भोसे,बाळू गोवे मंगळवेढा,किरण नकाते बोराळे,संदिप पडवळे मंगळवेढा,संजय कोळी जाडरबोबलाद,इराप्पा मेटकरी अंकलगी,महेश बिराजदार संख,महादेव कानडे तळसंगी,अशोक पवार भोसे,अजीज भैय्या अंकलगी आदी आरोपी एजंट आपल्या गावामधून येणार्‍या जाणार्‍या लोकांकडून अंदाजे आकडयावर पैशाची पैज लावून त्याच्या चिठ्ठया तयार करून त्यांचे फोटो मोबाईल व्हॅटसअ‍ॅपवर बुकीचालकाकडे टॅबवरील व्हॅटसअ‍ॅपवर पाठवित असल्याचे पोलिस हवालदार सुनिल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान,गेल्या अनेक वर्षापासून बुकीचालक मटका जुगार चालवित असल्याची माहिती या कारवाईवरून उघड झाली आहे.
तत्कालीन पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी जिल्हयातील मटक्यावर छापे टाकून मटका हद्दपार केला होता.त्या नंतर पहिल्यांदाच मंगळवेढा पोलिसांच्या इतिहासात ही कारवाई महिला पोलिस अधिकार्‍यांनी केल्याने गोरगरीब कुटुंबियांमधून समाधान व्यक्त होत आहे.मटक्यामुळे अनेक गोरगरीबांचे संसार रस्त्यावर आले आहेत.यापुर्वीही येथे अनेक अधिकारी येवून गेले मात्र एवढी धाडसी कारवाई अदयाप कोणीच केली नाही.परिणामी त्या महिला पोलिस अधिकार्‍यांचे कारवाईबाबत सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.

Pages