एकाविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे कल्याण नावाचा मटका जुगार घेणार्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून रोख 1370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ज्ञाबु¢नेश्वर दगडू सुरवसे(वय 64,रा.नागणेवाडी) याच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेची हकिकत अशी,प्रशिणार्थी महिला पोलिस अधिक्षिका नयोमी साटम यांना गोणेवाडी येथील मुख्य चौकात एक इसम कल्याण नावाचा मटका घेत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने दि.7 जुलै रोजी 4.40 वा. छापा टाकला असता आरोपी ज्ञानेश्वर सुरवसे हा कागदावर अंक आकडेमोड करून येणार्या जाणार्या लोकांकडून पैसे घेत असल्याचा पोलिसांना दिसून आला.पोलिसांनी यावेळी जुगाराच्या ठिकाणी रोख रक्कम 1370 तसेच एक निळया शाईचा बॉलपेन व पांढर्या रंगाची कागदी चिठ्ठी त्यावर कल्याण शुक्र असे लिहिलेली चिठ्ठी आदी जप्त करण्यात आले आहे.
प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिक्षक नयोमी साटम हया दारू,जुगार,मटका,वाळू आदी अवैध धंदयाबाबत त्या अॅक्शन मोडवर असून सध्या कारवाईची धडक मोहिम सर्वत्र सुरु आहे. मंगळवेढा शहर परिसरात ढाब्यावर जेवणाचे फलक लावून आतमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याची चर्चा असून अदयाप येथे एकही कारवाई न झाल्याने कारवाईत दुजाभाव होतोय की काय अशी शंका जनतेतून व्यक्त केली जात आहे. काही ढाबे हे दारूसाठी प्रसिध्द असल्याची चर्चा असताना पोलिसांचे मात्र या कडे डोळेझाक होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे यांनीही अवैध दारू विक्री करण्याबाबत कारवाई करण्याचे फर्मान काढले असून ज्या पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे चालू दिसतील संबंधित प्रभारी पोलिस अधिकारी व बीट अंमलदारावर कारवाईचे संकेत दिल्यामुळे जिल्हयातील सर्व पोलिस दल कामाला लागल्याचे चित्र.