साहेब आम्ही पाणी प्यायचे कुठे ? पाटखळ गावात एक महिन्यापासून पाणीटंचाई, पाटखळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष...... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, May 23, 2023

साहेब आम्ही पाणी प्यायचे कुठे ? पाटखळ गावात एक महिन्यापासून पाणीटंचाई, पाटखळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष......

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे साहेब पाणी प्यायचे कुठे ? असा प्रश्न येथील महीला व नागरिक विचारत आहेत.गावात एकच विहीर असून त्यात उन्हाळ्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली असून येथील नागरिकांवर हात पंपाचे गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.
पाटखळ गावात गेल्या दीड महिन्यापासून पाण्याचा थेंब नसल्याने ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे. ग्रामपंचायतीने या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटखळ ग्रामवासी यांनी केला आहे. या गावात ग्रामपंचायतचे फिल्टर पाण्याची सार्वजनिक पिण्याची पाण्याची सुविधा असून. फिल्टर पाण्याविना बंद राहतो व पाटखळ गावातील समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींचे सुध्दा या समस्येकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पाटखळ गावात पिण्याचे पाण्याची टंचाई याकडे आता कोण लक्ष देणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. साहेब आम्ही हातपंपाचे गढुळ पाणी प्यायचे का ? अशा प्रश्न निर्माण होत आहे.
पाटखळ गावामध्ये गेल्या दीड महिन्यापासून आम्ही पाणी विकत घ्यावे लागते आहे महिन्याला दोन हजाराचे पाणी विकत घेतो व ते वापरतो आम्हाला पाणी वेळेवर उपलब्ध करून द्यावी हीच आमची मागणी आहे. रेखा योगेश पवार महीला ग्रामस्थ
पाटखळ ग्रामपंचायतचे हातपंपाची संख्या 30 असून सर्व हातपंप दुरुस्त करून घेतलेले आहेत व हातपंपवरील मोटर बसवून टाकी भरण्यासाठी चार टाकी आहेत पण सध्या उन्हाळा असल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीतपणे होणे नसून भोसे उप-प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाणी पट्टी ग्रामपंचायतीने भरलेली असून येत्या चार ते पाच दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. पाटखळ ग्रामपंचायत सरपंच आनंद(ऋतुराज)बिले-पाटील

Pages