मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे विज पडल्याने चार जनावरे मृत्युमुखी..... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, May 10, 2023

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे विज पडल्याने चार जनावरे मृत्युमुखी.....

मंगळवेढा तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे दिनांक ९ मे रोजी रात्री ठिक दहा वाजता वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास जोराचा पाऊस झाला व यामध्ये विज पडून सिदाप्पा नामदेव गरंडे यांची चार जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत.
सदर घटनेची माहिती नंदेश्वरचे पोलीस पाटील संजय गरंडे यांनी महसूल प्रशासन व पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळविले असून त्यांनी घटनास्थळी येऊन तालुका पशुवैद्यकीय विकास अधिकारी डॉ. ब्रह्मानंद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.पांडुरंग हंबरडे यांनी चार जनावरांचे पोस्टमार्टम केले व याचा पंचनामा तलाठी बालम शेख यांनी केला.
यामध्ये मृत जनावरांमध्ये १ म्हैस,१ रेडा,१ खिलारी खोंड,व १ जर्सी गाय यांचा समावेश असुन या घटनेमुळे नंदेश्वरसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Pages