मंगळवेढ्यात संत चोखामेळाच्या 685 व्या स्मृतीदिना निमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धाचा सोहळा रंगणार.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, May 7, 2023

मंगळवेढ्यात संत चोखामेळाच्या 685 व्या स्मृतीदिना निमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धाचा सोहळा रंगणार....

संत चोखामेळाच्या 685 व्या स्मृतीदिन सोहळ्यास प्रारंभ.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
संत चोखामेळा यांच्या 685 व्या स्मृतीदिन सोहळ्यास दि.7 पासून विणापुजनाने प्रारंभ झाला.या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . आज सकाळी दामाजीपंत ते संत चोखामेळा समाधीपर्यंत ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा सोहळ्याने या सोहळयास प्रारंभ झाला.नामदेवरायाचे 16 वे वंशज ह.भ.प.माधव महाराज रामदास यांच्या हस्ते विणा पूजन झाले.त्यानंतर भव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन भगीरथ भालके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राहूल वाकडे,चंद्रकांत काकडे विक्रम शेंबडे,जयराज शेंबडे,ज्ञानेश्वर भगरे,सतीश दत्तू,विनायक कलुबरमे,अरुण गुंगे, अजित यादव,गणेश धोत्रे सह संत चोखामेळा ट्रस्ट व वारी परिवाराचे सदस्य उपस्थित होते. आज 8 मे रोजी 9 ते 5 या वेळेत भव्य भजन स्पर्धा तर संध्या. 7 वा.जेजुरी येथील ह.ब.प.मनोज मोरे महाराज यांच्या किर्तनाचे उदघाटन भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते अजित जगताप यांच्या अध्यक्षेतेखाली होणार आहे. यावेळी प्रवीण खवतोडे,मुरलीधर दत्तू,अँड दत्तात्रय खडतरे,बाबुराव राजमाने उपस्थित राहणार आहेत, 9 मे रोजी स 9 ते 4 पर्यंत महादेव यादव महाराज अरुण शिवशरण यांचे भजन होऊन तालुक्यातील सर्व भजनी मंडळे यांचे एकत्रित भजनाचा कार्यक्रम होणार आहे.सायं. 5 वा. भजन स्पर्धेतील पारितोषिक वितरण विठठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते अँड सुजित कदम यांच्या अध्यक्षेतेखाली होणार आहे यावेळी जयदिप रत्नपारखी,चंद्रकांत घुले,ज्ञानेश्वर कौडूभैरी,भारत ढोणे उपस्थित राहणार आहे.
सायं 7 वा. ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांच्या कीर्तनाचे उदघाटन शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते अँड.नंदकुमार पवार यांच्या अध्यक्षेतेखाली होणार आहे यावेळी राहुल शहा,तानाजी खरात,अरुणा माळी,चंद्रकांत कौडूभैरी,मुझ्झफर काझी, आयोजित केले आहे. दि 10 मे रोजी सकाळी 9 वा. संत चोखामेळा यांच्या समाधीस आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते समाधीस महाअभिषेक घातला जाणार यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर,उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील,तहसीलदार मदन जाधव,मुख्याधिकारी शशीकांत प्रचंडराव,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,पोलीस निरीक्षक रणजित माने हे उपस्थित राहणार आहेत.दुपारी 12 वाजता निवृत्ती महाराज रामदास यांचे कीर्तन व समाधीस पुष्पवृष्टी होऊन या सोहळयाची सांगता होणार आहे.या सोहळयासाठी संत चोखामेळा समाधी ट्रस्ट आणि वारी परिवार हे परिश्रम घेत आहेत.

Pages