मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आवताडे परिवाराचे वर्चस्व.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, April 28, 2023

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आवताडे परिवाराचे वर्चस्व....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अठरापैकी तेरा जागा बिनविरोध करण्यात आ.समाधान आवताडे आणि त्यांचे काका बबनराव आवताडे यांना यश आले होते. हे काका-पुतणे बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व राखणार हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते.
उर्वरीत पाच जागांसाठी आज मतदान झाले. पाच जागांमध्ये संस्था मतदारसंघातील दोन, तर ग्रामपंचायतमधील तीन अशा पाच जागांसाठी ९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यांमध्ये उतरले होते. आज सलगर बुद्रूक, भोसे, मंगळवेढा या तीन मतदान केंद्रावर जवळपास ९२ टक्के मतदान झाले आहे. मतदानानंतर लगेच सायंकाळी मतमोजणीही पूर्ण झाली आहे.
संस्था मतदारसंघामध्ये 924 पैकी 800 मतदान झाले. त्यापैकी चार मते बाद झाली, संगीता कट्टे यांना अवघी दोन तर कविता बेदरे, सविता यादव यांना प्रत्येकी 794 मते पडली. ग्रामपंचायतमध्ये एकूण 565 पैकी इतके मतदान झाले होते. त्यामध्ये जगन्नाथ रेवे 436, तर गंगाधर काकणकी 441, सोमनाथ माळी 101 यांना इतकी मते पडली. या प्रवर्गात सोमनाथ माळी यांचा पराभव झाला. ग्रामपंचायत विभागातील एका राखीव जागेसाठी पांडुरंग कांबळे 420, हौसाप्पा शेवडे 82, वैभव सोनवणे यांना फक्त एक मत पडले या प्रवर्गात पांडुरंग कांबळे हे विजयी झाले.पाच जागेसाठीच्या मतदानामध्ये आवताडे गटाचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
बाजार समितीच्या गत निवडणुकीतदेखील अवताडे गटाने १८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यंदाच्या निवडणुकीत १३ जागा यापूर्वीच बिनविरोध केल्या होत्या. निवडणूकीतून पाच अशा 18 जागा जिंकून सहकारी संस्थेत आवताडे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.शेतकऱ्याशी संबंधित असलेल्या या सहकारी संस्थेवर मतमोजणीनंतर आवताडे यांचे वर्चस्व आबाधीत राहिल्याबद्दल अवताडे समर्थक आणि फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण.

Pages