मंगळवेढ्यात पकडला बनावट विदेशी दारूचा साठा.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, April 27, 2023

मंगळवेढ्यात पकडला बनावट विदेशी दारूचा साठा....

मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील शिरनंगी गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारून मनावर देशी दारूचा साठा एक कार व मोटरसायकल असा तीन लाख 50 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान भरारी पथकाने हातभट्टीची वाहतूक रोखून सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही कारवायांमध्ये साडेचार लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादने हस्तगत केला आहे. राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाने 25 एप्रिल रोजी मंगळवेढा तालुक्यातील शिरनानगी गावच्या हद्दीत एका विनापरवाना विदेशी दारू विक्री केंद्रावर अचानक छापा टाकला तिथे बनावट विदेशी मध्य सापडले आरोपीस अटक करून येळगी ता.जत जि.सांगली या ठिकाणी जाऊन मारुती अल्टो कार (एम.एच.12 ईएम 2092) व एक हिरो होंडा फॅशन दुचाकी (एम.एच 05 एएल 1997) सह इंम्पिरियल ब्ल्यू विदेशी दारूच्या 11 पेट्या व मँकडाँवेल नंबर 1 दारूच्या दहा पेट्या 625 बनावट बुचे विदेशी मद्याचा कलर(कॅरॅमल) 2 लिटर तयार विदेशी मध्य 20 लिटर व विस्कीच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या असा एकूण तीन लाख 50 हजार 230 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
संदिपान भास्कर लांडगे (रा.शिरनांदगी ता.मंगळवेढा) बापू विष्णू आटपाडकर (रा.येळवी ता.जत जि.सांगली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई निरीक्षक संदीप कदम दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे सहाय्यक दुय्यम निरीक्षक रवी पवार जवान तानाजी जाधव,तानाजी काळे व अशोक माळी यांनी केली दरम्यान 26 एप्रिल रोजी भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने अक्कलकोट रोडवर पाळत ठेवून आकाश रवी चव्हाण (वय 25 रा.मुळेगाव तांडा)याला तीन चाकी टेम्पोतून एमएच १३ एएन 8650) रबरी ट्यूबमध्ये 450 लिटर हातभट्टीची वाहतूक करताना पकडले त्यांच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह 98 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Pages