मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, April 27, 2023

मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार....

प्रशासन कारभार स्वछ करन्यांचे त्यांच्यापुढे आहे आव्हान....!
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्विकारला असून येथील जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान,येथे लाच लुचपत विभागाने धाडी टाकल्यामुळे येथील प्रशासन कारभार स्वच्छ करण्याचे नवीन तहसीलदारांपुढे मोठे आव्हान आहे. तत्कालीन तहसीलदार स्वप्नील रावडे यांची बदली कोल्हापूर येथे झाल्याने त्यांचे रिक्त जागेवर आमदार बच्चू कडू यांच्या अचलपूर (जि.अमरावती) मतदार संघातून मदन जाधव हे येथे आले आहेत.त्यांचे मूळ गाव सांगली जिल्हयातील खरसुंडी हे असून ते सन 2013 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेत त्यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. त्यांनी आत्तापर्यंत देऊळगांवराजा जि.बुलढाणा,लोणार,सांगली आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.
मागील चार महिन्यापुर्वी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात स्वस्त धान्य दुकानदाराकडून मंथली हप्ता स्विकारताना पुरवठा निरिक्षक रंगेहाथ पकडल्याने त्यांच्यासह झिरो कर्मचारी यांना गजाआड व्हावे लागले.हे कार्यालय तहसीलदार यांच्या अंतर्गत येत असताना नागरिकांनी तक्रारी करूनही तत्कालीन तहसीलदारांनी त्याकडे डोळेझाक केल्यामुळेच ही घटना घडल्याची चर्चा आहे.नवनियुक्त तहसीलदार यांनी लाच प्रकरणामुळे बदनाम झालेले महसूल खाते पारदर्शी कारभार करून भविष्यात महसूल विभागाला लाचेचा डंक लागणार नाही असे कार्य करून दाखवावे अशा येथील नागरिकांच्या भावना आहेत.

Pages