अखेर लाच प्रकरणातील फरार तलाठी सुरज नळे लाचलुचपत पथकाला शरण.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, April 1, 2023

अखेर लाच प्रकरणातील फरार तलाठी सुरज नळे लाचलुचपत पथकाला शरण....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील महामार्गासाठी बाधीत झालेल्या पाईपलाईनच्या भरपाई पोटी 1 लाख 43 हजाराचे धनादेश काढून देण्यासाठी 7 हजाराची लाच घेवून लाचलुचपत पथकांच्या कर्मचाय्रास जखमी करुन चार चाकी वाहनातून फरार झालेला तलाठी सुरज नळे यास पोलीसांनी मंगळवेढा सोलापूर महामार्गावर ताब्यात घेतल्याची माहिती लाचलुचपत पथकाच्या अधिकाय्रांनी दिली.या प्रकरणातील खासगी इसम पंकज चव्हाण रा.शेलेवाडी यास चार दिवसाची पोलीस कोठडी दिली.या प्रकरणात लाचेची रक्कम स्विकारुन नळे फरार झाले त्याची चार चाकी गाडी कामती जवळ पोलीसांनी ताब्यात घेतली.या लाच प्रकरणाने नेहमी चर्चेत असलेले प्रांत कार्यालय आणखीन चर्चेत आले दरम्यान तलाठी नळे यांच्याकडून या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का ? हे तपासात समोर येणार आहे. मंगळवेढा तालुक्यात शासकीय कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी असलेले कर्मचारी मात्र शासनाची पगार घेऊन शासनाच्या योजनांची अंमलबजावणी किंवा शासनाचे कामकाज करताना सातत्याने आर्थिक मोबदल्याची अपेक्षा करतात ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी असून कामासाठी अडवणूक करणार्‍या कर्मचार्‍यावर कार्यालय प्रमुखाचे नियंत्रण नाही का? कर्मचार्‍याच्या कृत्याला मूक सहमंती आहे असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला.
शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचा शासकीय कामासाठी तहसीलदार, कृषी, पंचायत समिती, महावितरण, प्रांत कार्यालय आणि भूमिअभिलेख या शासकीय कार्यालयात ग्रामीण भागातील नागरिकांची सातत्याने वर्दळ असते.यामध्ये तहसील कार्यालयात नवीन शिधापत्रिका काढणे,ऑफलाइन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हेलपाट्याने बेजार होत आहेत. शेतकरी सन्मान योजनेची नवीन नोंदणी, न्यायप्रविष्ट प्रकरणासाठी आवश्यक असलेल्या रेकॉर्ड विभागातील जुने उतारे इतर कामासाठी देखील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, शालेय व जातीच्या दाखल्यासाठी सेतू व महा ई सेवा केंद्रातही भविष्यातील गर्दी लक्षात घेता गर्दी ही लूट थांबवणे गरजेचे आहे.तर भूमीअभिलेख कार्यालयात मोजणीसाठी व दाखल्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात.प्रांत कार्यालय हे देखील भूसंपादनाच्या मोबादल्यावरुन रडार आले होते पंढरपूरच्या सामाजिक संघटनेचे व प्रहार संघटनेचे आंदोलन प्रभावी ठरले. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी अशा कर्मचार्‍यावर नियंत्रण ठेवून ग्रामीण भागातील कर्मचारी नागरिकांना त्रास न होईल अशा पद्धतीची वागणूक देणे अपेक्षित होते. या प्रकाराकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील अनेक तक्रारदारानी लाचलुचपत खात्याचा पर्याय निवडला.राज्यामध्ये संत नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या मंगळवेढा नगरीत आतापर्यंत अनेक पंचायत समिती,जिल्हा परिषद बांधकाम,पाणीपुरवठा,पंचायत समिती शिक्षण,तहसील,आदी कार्यालयातील शासकीय कर्मचारी या लाच प्रकरणात बळी पडले. निदान आता तरी त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत बदलावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महसूल प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी नवनवे उपक्रम राबविले मात्र त्याच्या विभागाचे कर्मचारी पैशासाठी वारंवार वेठीस धरत असल्याचे दिसून येत आहे.

Pages