मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार घेवून दोन वर्षाचा नुकताच कालावधी पुर्ण झाला आहे. दरम्यान दोन वर्षाच्या कालावधीत सांगोला व मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे दाखल करुन जवळपास 48,93,762 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून दि.6 मार्च 2021 रोजी राजश्री पाटील यांनी कार्यभार स्विकारला. नागपूर येथील ट्रेनिंग सेंटर वरुन थेट प्रथमच डी.वाय.एस.पी. पदाचा महिला म्हणून पहिला मान पाटील यांना मिळाला. त्यांच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत मंगळवेढा हद्दीत सन 2022 - 287 दारुच्या केसेस करुन 4,76,322 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. जुगाराच्या 75 केसेस करुन 27,48,216 एवढा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांना यश आले. सन 2021 मध्ये 266 दारुच्या केसेस, जप्त माल 7,12,853 रुपये तर जुगाराच्या 46 केसेस जप्त माल 7,15,040 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत सन 2022 मध्ये दारुच्या 245 केसेस करुन 18,18,569 रुपये मुद्देमाल जप्त तर जुगाराच्या 63 केसेस करीत 2,00,706 रुपये जप्त केला. सन 2021 मध्ये दारुच्या 210 केसेस केल्या यामध्ये 6,28,947 रुपये, तसेच जुगाराच्या 64 केसेस करुन 12,29,800 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. असा एकूण मंगळवेढा व सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षात 48,93,762 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पाटील यांना यश आले आहे. या कारवाई बरोबरच सांगोला हद्दीत 63 लाखाचा गांजा महूद परिसरात जप्त करुन 4 आरोपींना गजाआड केले. सांगोला परिसरात रात्रीची गस्त घालताना जवळपास 40 लाखाचा पुन्हा गांजा जप्त करण्यात आला. आदी कारवाई बरोबरच 2 दरोडे, 56 घरफोड्या, 40 किरकोळ चोर्या दोन वर्षात 15 गुटख्याच्या गाड्या जप्त करण्यात मंगळवेढा हद्दीत यश आले आहे.
नंदेश्वर येथील तिहेरी खून प्रकरणाने सोलापूर जिल्हा हादरला असताना आरोपीला तात्काळ जागेवर पकडून जेरबंद केल्याने मृताच्या कुटूंबियाला न्याय मिळाला. डी.वाय.एस.पी.पाटील या मुळच्या सांगली जिल्ह्यातील शेटफळ गावच्या सेवानिवृत प्राचार्याच्या कन्या आहेत.त्यांच्या कालावधीत नुतन डी.वाय.एस.पी.कार्यालयाचे अनेक दिवस रेंगाळत पडलेले काम जातीने लक्ष देत स्वत: बांधकामावर उभे राहून काम पुर्ण केल्याने नवीन इमारतीमध्ये कामकाज लवकर सुरु होवू शकले. त्यांची ही आठवण मंगळवेढेकरांच्या स्मरणात कायम राहणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
Sunday, March 19, 2023

Home
मंगळवेढा विशेष
मंगळवेढ्याच्या सिंघम महिला डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत क्राईम आढावा, 48,93,762 रु. मुद्देमाल जप्त,