चोरीची घटना :- दहा तोळे वजनाची सोन्याची कांडी देण्याचा बहाणा करून मंगळवेढा बाजारातुन 80 वर्षीय वृध्देस चोरटयांनी बाेरमाळ घेऊन फसविले.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, March 15, 2023

चोरीची घटना :- दहा तोळे वजनाची सोन्याची कांडी देण्याचा बहाणा करून मंगळवेढा बाजारातुन 80 वर्षीय वृध्देस चोरटयांनी बाेरमाळ घेऊन फसविले....

या प्रकरणी दोघा अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल..... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढयाच्या आठवडा बाजारासाठी ग्रामीण भागातून आलेल्या एका 80 वर्षीय वृध्द महिलेस 10 तोळे वजनाची सोन्याची कांडी देन्याचा बहाना करून तुमची गळयातील अर्धा तोळे वजन असलेली सोन्याची बोरमाळ आम्हाला दया,असे म्हणून विश्‍वास संपादन करीत सोन्याची बोरमाळ घेवून विश्‍वासघात केल्याप्रकरणी दोघा अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी आक्काताई शामराव दबडे(वय 80 वर्षे,रा.पाटखळ) ह्या दि.13 रोजी पाटखळ येथून बसने दुपारी 12.00 वा. आठवडा बाजारसाठी आल्या होत्या.बसस्थानकापासून त्या बँक ऑफ इंडियाकडे पायी चालत जात असताना शिवप्रेमी चौकातील राजकमल ज्वेलर्ससमोर फिर्यादी आल्या असत्या त्यांच्याजवळ अंदाजे एक 50 वर्षे व दुसरा 70 वर्षे असलेले इसम अंगात पांढर्‍या रंगाचा कुडता व पांढरी विजार अशा वर्णनाचे दोन अज्ञात इसम जवळ आले.
फिर्यादीस म्हणाले,आम्हाला दहा तोळयाच्या सोन्याच्या दोन कांडया मिळाल्या आहेत.त्या तुमच्या आहेत काय? त्यावर फिर्यादीने सदरच्या कांडया माइया नाहीत असे म्हणताच ते म्हणाले,दोन सोन्याच्या कांडया तुम्ही घ्या व आम्हाला तुमच्या गळयातील बोरमाळ दया असे ते दोघे म्हणाले,यावेळी फिर्यादी बोरमाळ दयायची नाही असे म्हणाल्या. सदरच्या कांडया 10 तोळे वजनाच्या आहेत,यावर विश्‍वास ठेवून अर्धा तोळे वजनाच्या सोन्याची बोरमाळ काढून 50 वर्षे वयाच्या इसमाच्या हातात दिल्या. त्यावेळी एक गुलाबी रंगाचा कागद फिर्यादीच्या हातात दिला.त्यात सोन्याची कांडी असल्याने त्यांनी सांगितले. व तेथून तात्काळ मोटर सायकलवर निघून गेले.सदर कागद फिर्यादीने उघडून पाहिला असता त्यात कांडी दिसून आली नाही.तो पर्यंत ते दोघे गाडीवर फरार झाले. या दरम्यान अज्ञात दोघांनी विश्‍वासघात करून फसवणूक केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा तपास शहर बीटचे पोलिस करीत आहेत.

Pages