अर्धनारी ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम, सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, March 14, 2023

अर्धनारी ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम, सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण....

बेगमपुर/प्रतिनिधी
एखाद्याचा वाढदिवस म्हणलं की धामधूम, आतषबाजी जेवनावळी हे समीकरण ठरलेल असतं.आणि वाढदिवस जर कोणत्याही पदाधिकारी असलेल्या व्यक्तीचा असला की मग तर हे गणित ठरलेलेच असते.परंतु अर्धनारी ग्रामस्थांनी या परंपरेला फाटा देत एका आदर्श उपक्रमाची सुरुवात केली आहे.अर्धनारीचे नवनिर्वाचित सरपंच तथा घोडेश्वर पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पांडुरंग पवार यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.परंतु या वेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता येथील ग्रामस्थांनी पांडुरंग पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून पर्यावरण पुरक वाढदिवस करत एका नविन उपक्रमाची सुरुवात केली आहे
अर्धनारी हे भिमा नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक व निसर्ग संपन्न गाव असुन या वृक्षारोपणामुळे अर्धनारीच्या सौंदर्यात आणखीन भर पडणार आहे.यावेळी पिंपळ,चिंच,वड आशी निसर्ग समतोल राखणारी व आॅक्सिजन चा पुरवठा मोठ्या प्रमाणात करणारी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.जवळजवळ एकशे अकरा रोपांची लागवड करून त्यांना मुबलक पाणी मिळुन हे वृक्ष बहरावे यासाठी सर्व सोय करण्यात आली आहे.या वृक्षारोपणाच्या वेळी महादेव पवार,सचिन पाटील, सचिन जाधव, गणेश झाडे, संदेश सुरवसे, अमोल पवार,बिरू निकम, चंद्रकांत गवळी,प्रशांत पाटील, दिनेश सुरवसे,बाळु पाटील,बालजी यादव, विनायक भोसले,अज्जु फुलरी,नितीन ढवळे,रुपेश पवार, गणेश पवार, प्रशांत पवार,अदित्य पवार, दिनेश सुरवसे, विश्वास कोळी,प्रविण पाटील,शेखर पवार, समर्थ पवार, पांडुरंग पाटील, सुहास सर्व्हे,आण्णा शिवशरण,बाबा कोळी,गोपी जाधव,आण्ण जाधव,सागर गोडसे,स्वप्निल पवार, पांडुरंग कोळी,दत्ता शिवरशरण, प्रदिप शिवशरण, मुकुंद कुचेकर, इत्यादी उपस्थित होते.

Pages