मंगळवेढा शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीची भव्य मिरवणूक...... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, February 13, 2023

मंगळवेढा शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीची भव्य मिरवणूक......

मंगळवेढेकर 4.5 टनांच्या छत्रपतीच्या अश्वारूढ पुतळ्याचे जल्लोषात आगमन झाले... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या 18 फूट उंचीच्या 4.5 टन वजनाच्या ब्रॉन्झ धातुमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे कंटेनरमधून मंगळवेढेकर जल्लोषात आगमन झाले व शिवजयंतीपुर्वीच शहरातील वातावरण शिवमय झाले.संपूर्ण देशाला मंगळवेढ्यातील संतानी व इथल्या सर्व धर्मीय नागरिकांनी वेगळाच आदर्श घालून दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श पावन झालेल्या शहराला लागला इथल्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये ते मुक्कामी राहिले होते. शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी शहराच्या प्रमुख चौकात थोर महापुरुषांचे पुतळा बसवण्याचा संकल्प शहरातील तरुणांनी एकत्र येत नगरपालिकेच्या माध्यमातून व लोकसभागातून शिवप्रेमी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भुईकोट किल्ला परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शहीद किसन माने चौक ( बोराळे नाका) राजमाता अहिल्यादेवी यांचा पुतळा उभा करण्याचा संकल्प सर्व धर्मीयातील प्रमुख मान्यवराच्या व ज्येष्ठाच्या पुढाकाराने घेतला असून तो साकार होत आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 31 लाख खर्च 2018 च्या दरानुसार मूर्तिकाराला अॅडव्हान्स दिला. पुण्याचे मूर्तीकार थोपटे यांनी अथक परिश्रमातून मूर्तीचे काम केले यासाठी इथल्या तरुणांनी सरळ हाताने योगदान देण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यामध्ये राजकीय नेत्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी देखील चांगल्या पद्धतीचे सहभाग घेतला होता .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी निश्चित खर्चापेक्षा चबुतग्रासाठी व पुतळा आणण्यासाठी जवळपास 40 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. नगरपालिका फंडातून चबुतरा व नगरोत्थान योजनेतून सुशोभीकरण करण्यात येणार आहे यासाठी कला व सांस्कृतिक विभागाच्या मान्यता घेतल्या असून दोन महिन्यात चबुतय्राचे काम पुर्ण होताच मान्यवराच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

Pages