चोरीची घटना :- चोरट्यांनी पळविल्या पाठखळ परिसरातून 20 हजार रुपये किंमतीच्या 3 शेळ्या ..... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, February 11, 2023

चोरीची घटना :- चोरट्यांनी पळविल्या पाठखळ परिसरातून 20 हजार रुपये किंमतीच्या 3 शेळ्या .....

अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
पाठखळ येथे घरा शेजारी पत्र्याशेड मध्ये बांधलेल्या वीस हजार रुपये किंमतीच्या तीन शेळ्या चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सतिश माने हे पशुपालक असून शेतीला जोडधंदा म्हणून 10 शेळ्या, दोन म्हशी, दोन जर्शी गाय आदी पाळल्या आहेत. दि.10 रोजी रात्री 10 वाजता फिर्यादी व त्यांचे कुटूंब जेवणखाण करुन झोपी गेले. पहाटे चार वाजता फिर्यादी झोपीतून उठून शेळ्यांना चारा टाकण्यासाठी गेले असता त्यामध्ये 3 शेळ्या बांधलेल्या ठिकाणी दिसून आल्या नाहीत. परिसरात त्या शेळ्यांचा शोध घेतला मात्र मिळून आल्या नाहीत. फिर्यादीचे मित्र गोरख ताड व ते आटपाडी बाजार,नंदेश्वर बाजारात शोध करुन आले. मात्र त्यांना त्या सापडल्या नाहीत.
यामध्ये 6 हजार रुपये किंमतीची 2 वर्षाची एक शेळी, 7 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची 3 वर्षाची गाब 1 शेळी, 7 हजार रुपये किंमतीची 1 वर्षाची पांढरे कान असलेली गाब 1 शेळी असा एकूण 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Pages