मंगळवेढा ...त्या बोगस पिकविमा घोटाळयाच्या चौकशीस 11 पथकाव्दारे प्रारंभ...... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, February 16, 2023

मंगळवेढा ...त्या बोगस पिकविमा घोटाळयाच्या चौकशीस 11 पथकाव्दारे प्रारंभ......

1181 विमाधारक शेतकर्‍यांची आतापर्यंत तपासणी पुर्ण
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात झालेल्या पिक विमा घोटाळा प्रकरणाचा तपास 11 पथकाव्दारे वेगाने सुरु असून आत्तापर्यंत 2873 पैकी 1181 विमाधारकांची तपासणी झाली आहे.दरम्यान,अदयाप 1692 पिकविमा धारक तपासणी बाकी असून तपासणी पूर्ण होताच याचा अहल जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यात सन 22-23 या वर्षासाठी 2873 शेतकर्‍यांनी पिक विमा भरला आहे.पहिल्यांदाच मोठया प्रमाणात शेतकर्‍यांनी पिक विमा भरल्याचे चित्र आहे.दरम्यान,पिक विमा भरतेवेळी सलगर खु व सलगर बु. या दोन गावातील एजंटदारांनी महाई सेवा केंद्रातून जत,कोल्हापूर,व तालुक्यातील शेतकर्‍यांचे शेतात द्राक्ष,आंबा,डाळिब आदी पिके नसतानाही परस्पर 7/ 12 उतारे काढून पिक विमा भरून त्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे प्रकरण उघड होताच एकच खळबळ माजली असून ज्या शेतकर्‍यांच्या नावावर बोगस विमा उतरणे गेले आहेत. ते खुद्द स्वतः शेतकरी कार्सालयाकडे येयून एजंटदांनी बोगस विमा उतरल्याच्या तक्रारी करत असल्याचे चित्र आहे.
प्रामुख्याने हा प्रकार तालुक्याचा दक्षिण भाग,नंदूर-भालेवाडी व इतर गावातूनही बोगस विमा प्रकारण घडल्याची माहिती समोर येत आहे.सध्या तालुक्यात 11 पथकाव्दारे बोगस विमा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे.या पथकामध्ये विमा कंपनी 1,कृषी सहाय्यक --1,कृषी पर्यवेक्षक -एक,मंडल कृषी अधिकारी आदींचासमावेश प्रत्येक पथकात करण्यात आला आहे.आत्तापर्यंत या पथकाने 2873विमाधारकापैकी 1181विमा धारक शेतकर्‍यांची चौकशी दि.14 फेब्रुवारीअखेर झाली असून उर्वतीत 1692विमा धारक शेतकर्‍यांची चौकशी अदयाप बाकी आहे.दि.9 फेब्रुवारीपासून या चौकशीस प्रारंभ झाला असून पुढील आठवडयात चौकशी पूर्ण होवून तपासणी अहवाल जिल्हा कृषी अधिकारी यांना सादर केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली.ही तपासणी मोहिम तालुका कृषी अधिकारी गणेशश्रीखंडे यांचे मार्गदर्शनाखाली तपासणी सुरु आहे.

Pages