मंगळवेढा/प्रतिनिधीमंगळवेढा पोलीसांनी अवैध गुटखा वाहतूक करण्या-या पीकअपसह 23 लाख 40 रू 440 रू पकडला.याप्रकरणी गुटख्याच्या खरेदी विक्री मालकासह,चालक व वाहनमालक असा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीसाकडून गुटख्यावर वारंवार कारवाई केली जात आहे मात्र गुटखा काही केल्या कमी होण्याचे नाव दिसेना चडचण (कर्नाटक राज्य)मधून एक महिंद्रा बोलेरो पीकअप मधून काही इसम राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध्यरित्या घेवून येणार असल्याची माहिती दि.2 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.रणजित माने सो, पोहेकॉ महेश कोळी, उपविभागीय पोलीस कार्यालयाकडील पोना सुनिल मोरे,पोको मलसिद्ध कोळी, पोकॉ/ अजित मिसाळ, पोकॉ खंडाप्पा हताळे, असे पथक तात्काळ खाजगी वाहनाने रवाना झाले असता मरवडे गावाच्या अलीकडे हॉटेल सहयाद्रीच्या समोर 8.30 वा. चे सुमारास समोरून एम. एच 08 डब्ल्यु 4399 हे महिंद्रा पीकअप दोन इसमासह आलेनांव, गांव विचारले असता संभाजी अमसिध्दराव बन्ने वय 39 वर्षे रा. कमलापूर ता. सांगोला, बिकेन्नी गणपती नाव्ही वय 32 वर्षे जालिहाळ बु॥ ता. जत असे असल्याचे सांगितले. पोलीसांनी हौदयात काय आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने आम्ही त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर पीकअपच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले. सदर गुटखा व पिकअप वाहन हे कोणाचे मालकीचे आहे असे विचारले असता त्याने सदरचा गुटखा हा अमित विभुते रा. मंगेवाडी वाहन मालक तानाजी माळी रा. एकतपूर रोड सांगोला असे तर सदरचा गुटखा मल्लु चांदकोटी रा. चडचण जि. विजापूर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर सदर तिन्ही इसमाना महिन्द्रा पिकअपसह पिकअप मधील मुदेमाल पोलीस स्टेशनला घेवून येवून दोन पंचासमक्ष पिशव्या तपासला असता, विमल पान मसालाचे 1040 पाकीट प्रती पाकीटची 120 प्रमाणे 1,24,800, व्ही - १ तंबाखुचे 1040 पाकीट प्रती पाकीटची किंमत ३० रूपये प्रमाणे 31200, हिरा पान मसाला 2120 पाकीट प्रती पाकीटची किंमत 176 रूपये प्रमाणे 373120, रॉयल 717 तंबाखुचे 2120 पाकीट प्रती पाकीटची किंमत 44 रुपये प्रमाणे 93280,केसर युक्त विमल पान मसालाचे 832 पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत 187 रूपये 155,584, व्हि-१ टोबॉकोतंबाखुचे 832 पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत 33 रूपये प्रमाणे 28456,विमल पान मसालाचे 1890 पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत 198 रुपये प्रमाणे 374220, व्ही-१ टोबॅको तंबाखुचे 1890 पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत 22 रूपये प्रमाणे 41580, आर.एम.डी पान मसालाचे 280 पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत 780 रुपये प्रमाणे 2,18,400 , एम सेंटेंट तंबाखुचे 280 पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत 360 रुपये प्रमाणे 1 लाख 800 रू महिन्द्रा बोलेरो कंपनीचे चारचाकी पिकअप एम. एच 08 डब्ल्यु 4399 असा 23 लाख 40 हजार 440 रू. वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला. भारतीय दंड संहितेच्या कलम 188,272,273,व 328 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26(2) (i) व 26(2) (ii),26(2)(iv), सहवाचन कलम 27 (3) (E), कलम 30(2)(1) शिक्षापात्र कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ महेश कोळी हे करीत आहेत.या कारवाईत पो नि रणजीत माने, पोहेकॉ महेश कोळी, पोना सुनिल मोरे, पोकॉ मळसिध्द कोळी, पोकॉ अजित मिसाळ, पोकॉ खंडाप्पा हात्ताळे, सहभागी झाले.
Thursday, February 2, 2023

Home
मंगळवेढा विशेष
मंगळवेढा पोलिसांची मोठी कारवाई :- अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या गुटखा,वाहनासह 23 लाख 40 हजाराचा ऐवज हस्तगत,मंगळवेढा पोलीसाची कारवाई.....