झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला तिघांविरुध्द गुन्हा दाखल.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, January 31, 2023

झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला तिघांविरुध्द गुन्हा दाखल....

मंगळवेढा/प्रतिनिधी
शेतातील झाडे तोडू नका म्हणाल्याच्या कारणावरुन 37 वर्षीय महिलेच्या हाताला चावा घेवून डोकीत कोयत्याने मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी जाऊ ललिता देवाप्पा आकळे, दीर देवाप्पा केराप्पा आकळे, मुलगा विजय देवाप्पा आकळे (रा.येळगी) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा जखमी माधुरी बिराप्पा आकळे या सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नोकरीस असून दि.22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान शेतातील सामाईक विहिरीवर घरातील लाईट चालू करण्यास जात असताना विहिरीच्या कडेला फिर्यादीस झाडे तोडण्याचा आवाज ऐकू आल्याने जवळ जावून पाहिले असता आरोपी जाऊ ललिता ही झाडाखाली उभी होती, तर झाडावर तिचा मुलगा विजय हा झाड तोडत होता. फिर्यादीने आरोपी ललिता हिस तुम्हीं झाडे तोडू नका, झाडे आमच्या हिश्यात आहेत असे म्हणाल्यावर त्यांनी शिवीगाळ करुन तुझा काय संबंध आम्हांला बोलायचा असे म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण केली. यावेळी झाडावरुन आरोपी तथा मुलगा विजय खाली उतरुन तिथे पडलेली काठी घेवून पाठीवर, पायावर मारले. तर दीर देवाप्पा याने तेथे पळत येवून पडलेला कोयता घेवून डोकीत मारहाण केली, तर जाऊ हिने हाताचा चावा घेतल्याचे दिलेेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून तिला बहिण संगीता निमगरे हिने शासकीय रुग्णालय सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले असून तिच्या उपचार सुरु असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Pages