मंगळवेढा तालुक्यातील घटना :- महिलांच्या निर्घृणहत्येने नंदेश्वर गावात खळबळ.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, February 21, 2023

मंगळवेढा तालुक्यातील घटना :- महिलांच्या निर्घृणहत्येने नंदेश्वर गावात खळबळ....

मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारी एकच्या दरम्यान निर्गुणरित्या हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारी एकच्या दरम्यान निर्गुणरित्या हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडली आहे एकाच घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून दिपाली बाळू माळी (वय-25) संगीता महादेव माळी (वय-50) पाराबाई बाबाजी माळी (वय-45) या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हात्याराच्या साह्याने खून करण्यात आला आहे.तिन्ही महिलाची प्रेते घरासमोर अत्यावस्थ पडली होती. या घटनेने नंदेश्वरात खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले आहेत हत्याच्या कारणामागील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या तीन महिलांच्या खुणा मुळे नंदेश्वर गावावर शोकांकळा पसरली असून अचानक झालेला खून सत्रामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.त्यामुळे तपासांअती या खुणाचे कारण स्पष्ट होणार आहे.

Pages