चोरट्याचे धाडस ! बँकेच्या समोर लावलेली मोटर सायकल पळविली मंगळवेढयातील प्रकार,दोघांविरूध्द गुन्हा दाखल.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, December 13, 2022

चोरट्याचे धाडस ! बँकेच्या समोर लावलेली मोटर सायकल पळविली मंगळवेढयातील प्रकार,दोघांविरूध्द गुन्हा दाखल....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील लोकमान्य मल्टीस्टेट सोसायटीच्या समोर लावलेली 35 हजार रुपये किमतीची टिव्हीएस स्टार मोटर सायकल संगनमत करून चोरून नेल्याप्रकरणी विजय राजेंद्र भगरे व राजू जैनुद्दिन फुलारी(रा.चेळेकर गल्ली) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी विशाल सुब्राव इंगळे (रा.डोंगरगाव) हे मंगळवेढा येथील फॅबटेक मल्टीस्टेट बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम करत असून दि.10 रोजी दुपारी 12.00 वा. मोटर सायकल क्रमांक एम एच 13,ए ए 6734 ही लोकमान्य मल्टीस्टेटच्यासमोर लावून सांगोला येथे वसुली कामासाठी गेले होते.सायंकाळी 7.30 वा. परत सदर मोटर सायकलच्या ठिकाणी न येता फिर्यादीच्या मामाचा मुलगा विशाल उन्हाळे याच्या मोटर सायकलवर डोंगरगावी गेले. रविवारी बँकेस सुटी असल्याने ते दि.12 रोजी सोमवारी दुपारी 1.30 च्या दरम्यान मल्टीस्टेट ऑफिसजवळ आले असता वीर जीमच्या समोर लावलेली मोटर सायकल दिसून आली नाही.मल्टीस्टेटमधील सी.सी.टि.व्ही फुटेज चेक केले असता दि.10 रोजी रात्री 8.15 वा. विजय भगरे हा इसम मोटर सायकल ढकलत घेवून जात असल्याचे दिसून आले. याबाबत भगरेकडे चौकशी केली असता त्याने सदरची मोटर सायकल राजू जैनुद्दीन फुलारी याच्या घरी असल्याचे सांगितले.मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या चा अधिक तपास पोलिस हवालदार नवले हे करीत आहेत

Pages