रस्त्याची दुरवस्था :- दामाजी कारखान्याकडे जाणारे रस्ते खराब झाल्याने वाहतुकीत अडथळा.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, December 12, 2022

रस्त्याची दुरवस्था :- दामाजी कारखान्याकडे जाणारे रस्ते खराब झाल्याने वाहतुकीत अडथळा....

जिल्हा परिषद बांधकाम विभागाने लक्ष घालून तात्काळ रस्ते दुरुस्त करावेत
मंगळवेढा/प्रतिनिधी
श्री.संत दामाजी साखर कारखाना ते सोलापूर नॅशनल हायवे रोडकडे जाणारा तसेच कारखाना ते ब्रम्हपुरी जुना पंढरपूर रस्ता या रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाल्यामुळे कारखान्याकडे ऊस घेवून येणारी वाहने,बैलगाडया खराब रस्त्यामुळे यांचा रस्त्यात घोटाळा होवून त्यांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याने हे खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत अशी मागणी पुढे येत आहे.सोलापूर नॅशनल हाय वे कारखाना पाटील ते कारखान्यापर्यंतचा रस्ता जिल्हा परिषदेकडे असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे ऊ साने भरून येणारी वाहने पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी जागोजागी पडलेल्या खड्डयामुळे वाहनांचे पाटे व अ‍ॅक्सल तुटत असल्याने आदी वाहने,बैलगाडया रस्त्याच्या मध्येच त्यांना थांबावे लागत असल्यामुळे शेतकर्‍यांचा ऊस कालांतराने वाळण्याचा प्रकारही यामधून घडत आहे.अशा घटनांमुळे शेतकर्‍यांना वाहनचालकांना दोघांनाही आर्थिक फटका बसत आहे. ब्रम्हपुरी ते कारखान्याकडे जाणारा जुना पंढरपूर रस्ता हा जवळचा मार्ग म्हणून पुर्वीपासून ओळखला जातो. काही वर्षापुर्वी या मार्गावरूनच पंढरपूरकडे बैलगाडीच्या माध्यमातून शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेत असे.सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठया प्रमाणात बागायत क्षेत्र वाढले आहे.या रस्त्याची अवस्था अत्यंत शोचनीय झाल्याने या भागातील ऊस कारखान्यापयर्ंत कसा आणायचा असा शेतकर्‍यांपुढे गहन प्रश्‍न उभा आहे. हा कच्चा रस्ता असल्यामुळे सर्व खडी उखडून मोठे खड्डे पडले आहेत.या रस्त्याचे खडीकरण 26 डिसेंबर 2019ला झाले असून ऊसाची अतिअवजड वाहने या भागातून जात असल्याने रस्ता जागेवर न राहता संपूर्ण खड्डेमय रस्ता बनला आहे. या महत्वाचा रस्ता असल्यामुळे जि.प.बांधकाम विभागाचे अभियंता यांनी तात्काळ या रस्त्याचे उच्च प्रतीचे खडीकरण करून डांबरीकरण करावे अशी या परिसरातील शेतकर्‍यांची मागणी आहे.पावसाळयात हा रस्ता दलदलमय होत असल्याने शेतकर्‍यांना मोठी कसरत करीत पायी चालतच आपल्या शेताकडे जावे लागत असल्याचा अनुभव शेतकर्‍यांनी कथन केला.वरील दोन्ही रस्ते जिल्हा परिषद विभागाने तात्काळ दुरुस्त करून विना अडथळा वाहतुक करण्यास सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.
दामाजी कारखान्याकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने ऊस भरून जाणारी बैलगाडी अ‍ॅक्सल तुटल्याने जागेवर पडल्याचे छायाचित्रात दिसत आहे

Pages