मंगळवेढ्यात जिप चालकाने दंडात्मक कारवाईवरून वाहातुक पाेलीसाच्या श्री मुखात ओढली.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, December 17, 2022

मंगळवेढ्यात जिप चालकाने दंडात्मक कारवाईवरून वाहातुक पाेलीसाच्या श्री मुखात ओढली....

शासकिय कामात आडथळा आनल्याचा चालका विरूध्द गुन्हा दाखल...!
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा मरवडे मार्गावर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करीत असताना दंडा च्या कारवाईवरून एका जीप चालकाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या श्रीमुखात वाजवुन मशिनची ताेडफाेड करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी संताेष लक्ष्मण राठोड (रा. बालाजी नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी पोलीस शिपाई सत्यवान शिंदे हे वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.त्यांच्यासमवेत पोलीस नाईक शिवाजी पांढरे ही आसतात मात्र त्यांची साप्ताहिक सुट्टी असल्याने फिर्यादी एकटेच कर्तव्यावर हाेते. फिर्यादी दि.13 रोजी सकाळी १० वाजता मंगऴवेढा शहरात मोटर वाहन कायद्याप्रमाणे 18 केसेस करण्यात आल्या नंतर ते सायंकाळी ४.३० वाजता मरवडे रोडवरील रिलायन्स पंपाजवळ कारवाई करण्यासाठी थांबले असता मरवडेकडून मंगळवेढ्याकडे जानारी एम.एच.१४ GM.९८६७ ही एक क्रुझर जीप गाडी येताना त्यांना दिसली गाडीच्या समोरील नंबर स्पष्ट दिसत नसल्याने त्या वाहनाचा संशय आल्याने फिर्यादीने त्यास इशारा करून थांबवले असता चालक तथा आरोपी संताेष लक्ष्मण राठोड याने खाली उतरला फिर्यादी म्हणाले नंबर दिसत नाही.
दंडात्मक कारवाई करावी लागेल असे फिर्यादी म्हणत असताना आरोपीने कारवाई करण्यास नकार देऊन मी दंड आजपर्यंत भरला नाही व दंड ही करू देणार नाही असे म्हणत पाेलीस शिपायाच्या डावे गालावर जाेराची चापट मारून शासकीय गणवेशात असताना मशिन आदळुन ताेडफाेड करून १० हजाराचे नुकसान केले. दरम्यान आरोपी फिर्यादीच्या अंगाशी झाेंबा झोंबी करीत असताना फिर्यादी पोलिसांच्या ओळखीचे अमोल पवार रा.डाेणज हे तिथे येऊन त्यांनी आरोपीस समजावून सांगून बाजूस केले तुम्हा पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे का? असे म्हणून मोबाईल शूटिंग करून घेतले सरकारी कामात अडथळा करून अंगावर धावून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Pages