आता धुरळा ग्रामपंचायत निवडणुकांचा, मंगळवेढ्यातील 18 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 47 तर सदस्य पदासाठी 316 उमेदवार निवडणूक रिंगणात....... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, December 8, 2022

आता धुरळा ग्रामपंचायत निवडणुकांचा, मंगळवेढ्यातील 18 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 47 तर सदस्य पदासाठी 316 उमेदवार निवडणूक रिंगणात.......

रहाटेवाडी,फटेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध करन्यास राज्यकर्त्यांना यश...!
मंगळवेढा/प्रतिनिधी
तालुक्यातील 18 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 47 तर सदस्यासाठी 316 उमेदवार निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी उभे आहेत.दरम्यान,बुधवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज काढण्याकामी तहसील कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र होते.रहाटेवाडी,फटेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक राज्यकर्त्यांना यश आले आहे.
खोमनाळ-सरपंच 2,सदस्य-18,भालेवाडी -सरपंच-2,सदस्य-14,पौट-सरपंच -2,सदस्य-15,बावची-सरपंच 2,सदस्य-18,गुंजेगांव -सरपंच -3,सदस्य-18,ढवळस -सरपंच- 3,सदस्य-20पैकी एक बिनविरोध,शिरनांदगी-सरपंच -2,सदस्य -19,मारोळी-सरपंच -3,सदस्य-19 पैकी एक सदस्य बिनविरोध,रहाटेवाडी-सरपंच-1,(बिनविरोध) सदस्य-6 (सर्व बिनविरोध), डोंगरगाव-सरपंच-5,सदस्य-32,हाजापूर सरपंच -2,सदस्य-9 पैकी 5 बिनविरोध,गोणेवाडी-सरपंच-2,सदस्य-15पैकी 2 बिनविरोध,येड्राव- सरपंच -2,सदस्य-18,मारापूर सरपंच -3,सदस्य-19,सोड्डी-सरपंच -2,सदस्य -18,तळसंगी -सरपंच -2,सदस्य-22,पाटखळ -सरपंच -8,सदस्य-29 पैकी एक बिनविरोध,फटेवाडी -सरपंच (बिनविरोध)-1,सदस्य-7(बिनविरोध) असे एकूण 18 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 47 तर सदस्य पदासाठी 316 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.दरम्यान,18 ग्रामपंचायतीपैकी रहाटेवाडी,फटेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

Pages