मंगळवेढा/प्रतिनिधीबोराळे येथील ग्रामविकास अधिकारी तथा आरोपी गोपीचंद दादा गवळी (वय 56)याला 1 लाखापैकी पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेची हकिकत अशी,यातील आरोपी हा बोराळे येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे.यातील तक्रारदार तथा ठेकेदाराने पंधराव्या वित्त आयोगाच्या कामाचे व जिल्हा परिषद सेस निधीअंतर्गत आजपर्यंत केलेल्या कामाची बिले त्याच्या खात्यावर जमा केल्याने तक्रारदाराकडे दि. 28 जुलै 2022 रोजी 1.44 ते 2.29 या दरम्यान आरोपीने पदाचा दुरुपयोग करून एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणाची पोलिसांनी पडताळणी करून आरोपीविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपीस तपासिक अंमलदार चंद्रकांत कोळी यांनी गुरुवार दि.1 डिसेंबर रोजी पंढरपूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान आरोपीस चौकशीस लाच लुचपतच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतल्याचे समजताच पंचायत समितीचे जबाबदार अधिकार्यांनी कार्यालयातून पळ काढल्याची खमंग चर्चा कार्यालयात चालू आहे.घरकुल,विहिर व अन्य कामाची बिले काढल्यानंतर कागदावर वजन ठेवल्याशिवाय जबाबदार अधिकारी सही करीत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. ग्रामविकास अधिकार्यांनी एक लाख रुपये लाचेपैकी 50 हजाराची मागणी केली. या पैशात नेमके कोण कोण भागिदार होते याचीही चौकशी होणे तितकेच गरजेचे आहे.तपासिक अंमलदाराने आरोपीस तात्काळ अटक न करता विलंब का लावला? आरोपी त्या रात्री नेमका कोठे होता? याचा संपूर्ण तपास दुसर्या अधिकार्याकडून पुणे विभाग लाचलुचपतचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांनी करून या प्रकरणातील सत्य बाहेर आणावे अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.तपास अधिकार्याची प्रसार माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केली मात्र पत्रकारांनी पाठपुरावा करून अखेर माहिती मिळवून या घटनेतील सत्यता नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले.
Thursday, December 1, 2022

Home
मंगळवेढा विशेष
एक लाखांची लाचेची मागणी : करणार्या त्या ग्रामविकास अधिकार्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी.....